Leopard Attack On Farmer In Aurangabad District 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात शेतात पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये दहशत

वाल्मिक पवार

चापानेर (जि.औरंगाबाद) : बनशेंद्रा (ता.कन्नड) शिवारातील गट नंबर १६० शेतात आज शुक्रवार (ता.दोन) दुपारी एक वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला आहे. या शेतात महेश मोतींगे हे पाणी भरण्यासाठी गेले असता अचानक मागून बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. ही  घटना शुक्रवारी (ता. दोन) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे शेतकरी आणि गावकरी जमा होऊन संबंधित वनविभागतील वनपाल प्रवीण कोळी यांना घटनेबाबात माहिती देण्यात आली.

त्यानंतर प्रवीण कोळीसह वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्य सुरू आहे. जखमी महेश मोतींगे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. अन्यथा अनेकांना जीव गमवावे लागेल.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार व खंडणी; आरोपीस २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी!

BIGG BOSS MARATHI 6: स्वर्ग पाहाल की नर्क? 'बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार घोषणा; कोण करणार सूत्रसंचालन

Raj Thackeray’s Emotional Tribute to Dharmendra : ... पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी – राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!

Anna Hazare : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन’ची नवी दिशा!

Latest Marathi News Live Update : शौर्य पाटीलच्या वडिलांचा आंदोलनात सहभाग

SCROLL FOR NEXT