corona impact 
छत्रपती संभाजीनगर

Corona Impact: कोरोनामुळे लाखोंची उलाढाल ठप्प; प्रदूषणात घट

देवदत्त कोठारे

खुलताबाद (औरंगाबाद): तालुक्याची ऐतिहासिक, धार्मिक अन् पर्यटन महत्त्व पाहता येथे वर्षभर भाविकांसह पर्यटकांची वर्दळ असते. यात वाहनांच्या पार्किंगमधून वेरूळ, खुलताबाद येथे लाखोंची उलाढाल होत असते. परंतु, कोरोनामुळे गत वर्षभरापासून येथे येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याचा परिणाम लाखो रुपयांच्या उलाढालीवर झाला आहे. असे असले तरी येथे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात मोठी घट झाली आहे.

वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरासमोर व खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थानअंतर्गत पे पार्किंगची सुविधा आहे. वेरूळ येथील जग प्रसिद्ध लेणी, १२ वे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वर, तसेच खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविक, पर्यटक येतात. वेरूळ येथे पावसाळ्यात अन् श्रावण महिन्यात पर्यटकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. नेहमी वाहनतळांबरोबरच इतर मोकळ्या जागांचेही वाहनतळात रूपांतर होत असते. हीच परिस्थिती खुलताबादलाही असते.

परंतु, यंदा पर्यटकांनी पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवली आहे. याचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम जाणवत आहे. शिवाय नेहमी हाउसफुल दिसणारी वाहनतळ यंदा मैदानसदृश अवस्थेत दिसून येत आहेत. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती येथील वाहनतळाच्या वसुलीचा वार्षिक लिलाव केला जातो. यातून पार्किंग चालविणाऱ्याकडून एक रकमी पैसे घेतले जातात. सध्या वेरूळ लेणी/घृष्णेश्वर मंदिर येथे चारचाकी वाहनांसाठी ५० रुपये, दुचाकी- २० रुपये, लक्झरी- ७० रुपये तर भद्रा मारुती मंदिर येथे चारचाकी- ५०, दुचाकी-२० तर लक्झरीसाठी ७० रुपये पार्किंगचा दर आहे.

बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी- 
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, गल्लेबोरगाव, सुलतानपूर, बाजारसावंगी या गावांमध्ये ग्रामपंचायतीतर्फे कोणत्याही वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवतो. मोकळ्या जागेवर वाहनधारक वाहनांची पार्किंग करतात. याचा बाजारकरूंना मोठा त्रास सहन करावा लागतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT