dead bodies found in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाल्यावर पत्नीनेही सोडला प्राण; आठवडाभर फ्लॅटमध्ये कुजत होते मृतदेह

सुषेन जाधव

औरंगाबाद: ७० वर्षीय दाम्पत्याचा अपार्टमेंटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी (ता.२३) दुपारी साडेतीन वाजता समोर आली. माधुरी विजय मेहंदळे (६५), विजय माधव मेहंदळे (७०) असे त्या मृत दाम्पत्याचे नाव असल्याची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्‍वर रोडगे यांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात निरीक्षक रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सीलालनगरातील अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ४०३ मध्ये मेहेंदळे वृयोवृद्ध दाम्पत्य राहत होते. मागील १० ते १५ दिवसांपासून ते घरातून बाहेर आलेच नाहीत, तसेच घरातून उग्र वास येत असल्याची माहिती मामा चौक पदमपुऱ्यातील प्रमोद देववतवाल (४३) यांनी पोलिस ठाण्यात जाऊन दिली.

दरम्यान निरीक्षक रोडगे व सहायक पोलिस निरीक्षक कंकाळ, उपनिरीक्षक देवकते यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, फ्लॅटचा दरवाजा आतून लावलेला होता. पोलिसांनी छतावर जाऊन गॅलरीत उतरुन किचनच्या गॅलरीतून आत पाहिले असता घरात माधूरी मेहेंदळे आणि विजय मेंहेदळे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन उत्तरीय तपासणीसाठी घाटीत दाखल केला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त एस. एच. भापकर यांनीही भेट दिली. पुढील तपास निरीक्षक शंकर डुकरे करत आहेत.

मुलगी अमेरिकेत, ‘खाकी’नेच केले अंत्यसंस्कार 
यासंदर्भात मेंहदळे दांपत्यांच्या अपत्यांविषयी पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना एक मुलगी असून सध्या ती अमेरिकेत असल्याचे समजले. दरम्यान तिच्याशी संपर्क केला असता, तीला अंत्यविधीसाठी पोहोचता येत नसल्याचे तिने पोलिसांना कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान वेदांतनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर डुकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंहदळे दांम्पत्यावर अंत्यसंस्कार केले. विजय मेंहदळे यांना सोरायसीस हा आजार जडला होता, तर माधुरी मेंहदळे यांना पॅरालिसीस झाला होता, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक शंकर डुकरे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT