valuj bike theft 
छत्रपती संभाजीनगर

अट्टल चोराकडून तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी  जप्त

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद): एका अट्टल दुचाकी चोरीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करून वाळूज औद्योगिक वसाहतीसह नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या 12 दुचाकी (शुक्रवारी ता.26) रोजी जप्त करण्यात आल्या.

या बाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी माहिती दिली की, बुधवारी (ता.24) रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोरी करणारा धनंजय ऊर्फ धन्या पिटोरे /पिंपळे वय 30 रा. जोगेश्वरी हा रांजणगाव (शेणपुंजी) फाटा येथे येणार आहे. माहिती मिळताच सापळा रचून रेकॉर्डवरील अट्टल दुचाकी चोर धनंजय ऊर्फ धन्या पिंपळे यास अटक केली. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चार ते पाच दिवसांपुर्वी बजाज प्लॅटीना दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच मागील तीन वर्षांपासून वाळूज एमआयडीसी हद्दीत तसेच विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. त्याला अटक करून पोलीस कोठडी घेतली असता त्याने विंचुर ता. निफाड जि. नासिक तसेच हारेगाव, रांजणी ता. श्रीरामपुर येथुन 6 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर चोरी केलेल्या दुचाकी कोठे विक्री केल्या त्याबाबत आरोपी माहिती देत नव्हता.

मात्र गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, पोलीस काँस्टेबल धर्मराज गायकवाड यांनी माहिती दिली की आरोपी धन्याने सोलेसांगवी, शेवगाव येथे दुचाकी विक्री केलेल्या असुन त्याबाबतची आम्हाला माहिती आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळताच त्यांची मदत घेऊन सोलेसांगवी ता. शेवगाव येथुन 6 दुचाकी जप्त केल्या. असे एकुण 3 लाख 20 हजाराच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी (गुन्हेशाखा), पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, नवाब शेख, सुधीर सोनवणे, पोलीस शिपाई विनोद परदेशी, मनमोहनमुरली कोलीमी, बंडु गोरे, हरीकराम वाघ, रेवनाथ गवळे, दिपक मतलबे, धर्मराज गायकवाड (गुन्हेशाखा) यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT