Aurangabad buy seeds then Chemical fertilizers agricultural service center sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : बियाणे घेतले तरच रासायनिक खते

फुलंब्री : कृषी सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

नवनाथ इधाटे

फुलंब्री : तालुक्यामध्ये सध्या काही भागात पाऊस पडला तर काही भागातही आता पावसाला सुरुवात होत असून शेतकरी आता खरीप पिकाच्या लागवडीसाठी कृषी सेवा केंद्रचालकाकडे बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी जात आहे. मात्र, काही कृषी सेवा केंद्रचालक बियाणे घेतले तरच रासायनिक खते देतो, असा पवित्रा घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्याच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी पेरणी करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या कृषी सेवा केंद्रातून बी-बियाणे व रासायनिक खते घेऊ लागले आहे. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी बाजारात शेतकरी गर्दी करीत आहे. मात्र फुलंब्री शहरासह तालुक्यात असणाऱ्या काही कृषी सेवा केंद्र दुकानांमध्ये बियाणे व रासायनिक खते देताना कृषी सेवा केंद्रचालक अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्याची पसंती असलेल्या कृषी सेवा केंद्रांमध्ये केवळ बियाणे उपलब्ध असल्याने ते बियाणे घेऊन जात आहे तर उर्वरित रासायनिक खते घेण्यासाठी इतर कृषी सेवा केंद्र दुकानात गेल्यानंतर कृषी सेवा केंद्र चालक बी-बियाणे घेण्याची सक्ती करीत आहे.

बियाणे घेतले तरच रासायनिक खते मिळतील असे बळिराजाला सांगण्यात येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी कृषी सेवा केंद्रचालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पथक केवळ कागदोपत्री

फुलंब्री तालुक्यातील कृषी सेवा केंद्रचालक दुकानातून रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना चांगली दर्जाचे देण्यासाठी कृषी विभागामार्फत पथक तैनात केले आहे. मात्र, सदरील पथक कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे बियाणे व रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहे. तर इतर कंपनीचे हलक्या दर्जाचे बियाणेही उपलब्ध आहे. जास्तीच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. मात्र, कृषी विभागाच्या पथकाकडून कृषी सेवा केंद्र तपासणी सातत्याने करणे गरजेचे आहे.

खरीप हंगामासाठी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना अडचणी येत आहे. मी ओळखीच्या कृषी सेवा केंद्रात बियाणे खरेदी केले. रासायनिक खते त्यांच्याकडे नसल्यामुळे शहरातील इतर दुकानात रासायनिक खते घ्यायला गेलो. मात्र बी-बियाणे घेतले तरच रासायनिक खते देतो, अशी अडवणूक कृषी सेवा केंद्र चालकांनी केली आहे. अशा दुकानावर कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.

- रावसाहेब मालोदे, शेतकरी, दरेगाव दरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT