Aurangabad Carewell Multispecialist Hospital robotics surgery 65 year old man 
छत्रपती संभाजीनगर

रोबोटिकच्या माध्यमातून ६५ वर्षीय वृद्धावर यशस्वी शस्त्रक्रिया

केअरवेल मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : व्यंकटेशनगर येथील केअरवेल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. याच माध्यमातून वाशीम येथील एका ६५ वर्षीय रुग्णावर रुग्णालयातील पहिली आणि राज्यातील दुसरी रोबोटिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डॉ. अभिषेक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील रुग्णांना पूर्वी गुडघे दुखी व इतर व्याधींवर आधुनिक उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते. मात्र, केअरवेल सुपरस्पेशालिटी रुग्णालयातार्फे मराठवाड्यातील रुग्णासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहे. याच माध्यमातून रोबोटिक जॉईट रिप्लेसमेंटची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. ‘युएसएफडी’ अप्रूव्ह आणि रोबोटिक आर्म असलेली ‘रोझा रोबोटिक’ ही यंत्रणा मध्य मराठवाड्यात पहिल्यांदा केअरवेल हॉस्पिटलच्या माध्यमातून औरंगाबादेत उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील हे दुसरे आणि देशातील सातवे यंत्र आहे, अशी माहिती अस्थीरोगतज्ज्ञ आणि जॉइंट रिप्लेसमेंटतज्ज्ञ डॉ. अभिषेक शिंदे यांनी दिली.

या सुविधेमुळे आता शस्त्रक्रियेत अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. कमी चीर, कमी रक्तस्राव आणि रुग्णालयातून अवघ्या तिसऱ्या दिवशी सुट्टी, हे या नव्या सुविधेमुळे शक्य झाले आहे. पहिल्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ. शिवराज चिलवंत, डॉ. रवी चव्हाण, ओटी असिस्टंट सूरज निकाळजे, विमल मांदळे, योगेश कानडे, सागर सूर्यवंशी यांनी यासाठी मदत केले. प्रकल्पासाठी डॉ.महेश शिंदे,डॉ. विलास राठोड,डॉ. सुशील शिंदे यांचे सहकार्य मिळाले. सीईओ योगेश देशमुख यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Child Marriage : मोहळाईत 16 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला; 112 हेल्पलाईन व पारध पोलिसांच्या तत्पर कारवाईने अनर्थ टळला

Pune Manikbagh fraud: सावकारी पद्धतीने ४४ लाखांची फसवणूक; माणिकबाग येथील दोन गाळे खरेदीखत करून बळकावल्याचा आरोप

Mumbai Weather: मुंबईकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! पुढील ४ दिवस 'घामाच्या धारा'; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT