Aurangabad Municipal Corporation News sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद: शहरातील ५० वसाहतींची जातिवाचक नावे बदलणार

उपायुक्त अपर्णा थेटे : नागरिकांकडून मागवणार नवी नावे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्य शासनाने गावांसह शहरे, वस्त्या व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील ५० वसाहतींची नावे बदलली जाणार आहेत. नव्या नावासाठी संबंधित भागातूनच नावे मागविण्यात येतील, असे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. जातीवाचक नावामुळे समाजात तेढ निर्माण होऊन संघर्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने अशी नावे बदलण्याचे आदेश काढले आहेत.

त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील वसाहती व रस्त्यांची जातिवाचक नावे शोधून ते बदलण्याची जबाबदारी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यावर सोपविली आहे. या संदर्भात श्रीमती थेटे यांनी सांगितले की, शहरातील जातिवाचक वसाहती व रस्त्याची नावे शोधण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. वॉर्ड अधिकाऱ्यांनी नावे कळवली असून, आता वॉर्डातील नागरिकांकडून नावे मागवली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर जाहीर प्रगटनाव्दारे नावांना प्रसिध्दी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अशी आहेत नावे

प्रभाग एक

डिंबर गल्ली, ब्राम्हण गल्ली, कुंभार गल्ली, मल्लावपुरा, बेगमपूरा, भिल्ल गल्ली, भिमनगर, भंगीवाडा, मांगवाडा (भावसिंगपुरा गाव), चांभारवाडा (भिमनगर, भावसिंगपूरा गाव), बौध्दवाडा, मोमीनपुरा, लोटाकारंजा, माळीवाडा (बारुदगर नाला).

प्रभाग दोन

धोबीघाट (काचीवाडा), नवाबपुरामधील तेलंगवाडा गवळीपूरा, राजाबाजारमधील बोहरी कठडा, गुलमंडीमधील जोहरीवाडा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, नागेश्वरवाडीतील पारधीपुरा भोईवाडा, औरंगपुऱ्यातील बौद्धवाडा (पैठणगेट), सिल्लेखान्यातील कैकाडीवाडा, समर्थनगरातील भोईवाडा.

प्रभाग चार

मयूरपार्क भागातील गोंधळवाडा, हर्सूल प्रभागातील धनगर गल्ली, सोनार गल्ली, ब्राम्हण गल्ली, मांगवाडा, कैकाडी गल्ली, चांभार गल्ली, एकतानगरातील चांभार गल्ली, कोळीवाडा, सोनार गल्ली.

प्रभाग पाच

नारेगावातील भाटनगर, पटेलनगर, चौधरी कॉलनीतील शहानगर, पटेलनगर.

प्रभाग सहा

चिकलठाण्याच्या कामगार कॉलनीतील खाटीक गल्ली (कुरेशी गल्ली) धनगरवाडा, साठेनगर (मांगवाडा) बौध्दवाडा, सुतार वाडा, माळी गल्ली, कुंभारवाडा, तेलीगल्ली, मुल्लागल्ली, ब्राम्हण गल्ली, चांभारवाडा.

प्रभाग सात

बौध्दवाडा (गोधडीपूरा), भारतनगरातील वैदुवाडा (वैदू मंदिर).

प्रभाग नऊ- बौध्दनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT