औरंगाबाद : शहरात पाण्याची ओरड सुरूच आहे. सिडको एन-२ भागात शुक्रवारी तब्बल नवव्या दिवसी नळाला पाणी आले. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला. सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्याकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी दिली. पाण्याच्या टाकीनिहाय्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतरही नागरिकांना तब्बल नऊ दिवस पाण्याची वाट पाहवी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको-हडको भागात पाण्यासाठी नागरिकांचे सतत आंदोलने सुरू आहेत. आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसी श्री. पांडेय यांनी पाणी पुरवठा विभागाची अतुल सावे व भाजपच्या माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे पुन्हा जबाबदारी दिली. प्रत्येक पाण्याची टाकीची जबाबदारी अधिकाऱ्यांना नेमून दिली.
या नियोजनानंतर तरी पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. पण अद्याप नागरिकांचे पाण्यासाठी आंदोलने सुरूच आहेत. ठाकरे नगर भागातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. काल पुंडलीकनगर पाण्याच्या टाकीवर चढून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सातत्याने पाण्यासाठी आंदोलने सुरू असले तरी पाण्याचा गॅप दिवसेंदिवस वाढत आहे. सिडको एन-२ भागात यापूर्वी सहा एप्रिलला पाणी आले होते. त्यानंतर आज १५ एप्रिलला नळाला पाणी आले. उन्हाळ्यामुळे बोअर आटले असून, नळाला तब्बल नवव्या दिवशी पाणी येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पाणीपुरवठा विभागात राजकारण!
ऐन उन्हाळ्यात महापालिका प्रशासकांनी पाणी पुरवठा विभागात केलेल्या बदलांमुळे अधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू आहे. कार्यरत अधिकाऱ्यांना डावलून निवृत्त अधिकाऱ्याकडे देण्यात आलेली जबाबदारी अनेकांना पचनी पडलेली नाही. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी हातचा राखून काम करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.