जिल्हाध्यक्षपदी शरीफोद्दीन ख्वाजा यांची वर्णी sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शहर राष्ट्रवादीत खांदेपालट

जिल्हाध्यक्षपदी शरीफोद्दीन ख्वाजा यांची वर्णी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका निवडणुकांच्या उद्देशाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सूरू केली असून साचलेपण आलेल्या पदाधिकाऱ्यांना डच्चू देत नवीन चेहरे समोर आणले जात आहेत. राष्ट्रवादीकडूनही हे प्रयोग होत आहेत; याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने शहर-जिल्हाध्यक्षपदी मुस्लिम समाजातील चेहरा दिला आहे. शरीफोद्दीन ख्वाजा यांची शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली.

मुस्लीम समाजाला पक्षात चांगले स्थान मिळावे, संधी मिळावी, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे समाजाताली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती. याची दखलही वरिष्ठांनी घेतली व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी शरीफोद्दीन ख्वाजा यांची निुयक्ती करण्यात आली. त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यापुर्वी शेख जफर व सय्यद मतीन या दोन नगरसेवकांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तीन वेळा नगरसेवक

ख्वाजाभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांचा मुस्लिम समाजात तगडा जनसंपर्क आहे. याचा फायदा महापालिका निवडणूकीत होईल. मुस्लीम मतदारांना एमआयएमपासून दूर ठेवण्यासाठी ख्वाजाभाई यांच्यासमोर आव्हान असून हाही उद्देश जिल्हाध्यक्षपदी त्यांना बसविण्याचा आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढत असताना राष्ट्रवादी-कॉंग्रेसची ताकद दिसली नाही. पण आता शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात आव्हान देणार असल्याने इतर पक्षांचा मतांवर डोळा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT