Aurangabad Omicron Positive I want vacation I mean sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरात एकाच दिवशी ८७ पॉझिटिव्ह

कोरोना संसर्गाची तिसरी लाट उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसात कोरोना (Corona) संसर्गाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी (ता. चार) एकाच दिवसात तब्बल ८७ जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिसरी लाट (third wave) शहराच्या उंबरठ्यावर असल्याचे मानले जात आहे.

कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूमुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी (ता. दोन) २८, सोमवारी (ता. तीन) २९ तर मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७ वर गेली आहे. अचानक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग लागण होऊ नये यासाठी नागरिकांनी मास्क वापरावा. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सॅनेटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सुरक्षित अंतर ठेवावे, लग्न समारंभ, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices: 253 दिवस... 6,072 तास... सोन्याच्या भावात 34,050 रुपयांची वाढ; दिवाळी पर्यंत किती वाढणार सोनं?

Latest Marathi News Updates : अक्कलकोटमधील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Billionaires List : इलॉन मस्कला टाकले मागे, ८१ व्या वर्षी बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत लॅरी एलिसन?

Javelin Throw Competition; अहिल्यानगरच्या शिवमने मोडला ‘गोल्डन बॉय’ नीरजचा विक्रम; भालाफेकमध्ये ८४.३१ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

IMD Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' तारखेला परतीचा मान्सून धडकणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT