sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कोंडून घेताच अधिकाऱ्याने दिली मोजणीची तारीख

गंगापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : पाणंद रस्ता मोकळा करावा म्हणून मोजणीसाठी अर्ज करूनही कुणी दखल घेत नसल्याने येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला कोंडून घेताच पाणंद रस्ता मोजणी उद्याच होईल असे लेखी आश्वासन दिले. यानंतर धामोरी (खुर्द) येथील उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी आंदोलन मागे घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धामोरी (खुर्द) गावातील पाणंद रस्ता मोकळा करावा म्हणून अनेकदा मोजणीची तारीख मागितली. मात्र, संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत होते. याविषयी आमदार प्रशांत बंब यांनी आमसभेत तत्काळ रस्ते मोकळे करण्यात यावेत, अशा सक्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तरीही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने धामोरी (खुर्द) येथील उपसरपंच चव्हाण यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनाचा पवित्रा घेतला.

सहा महिने उलटूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठलीच प्रक्रिया न झाल्याने संतप्त चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना कोंडून घेत जाब विचारला. यानंतर पाणंद रस्ता मोजणी उद्याच होईल असे लेखी आश्वासन कार्यालयातील अधिकाऱ्याने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT