Aurangabad  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : जागतिक मेंदू पक्षाघात दिवसानिमित्त कार्यक्रमाची सांगता

पोद्दारच्या सामान्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांसोबत विविध खेळांचा घेतला आनंद

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जागतिक मेंदू पक्षाघात (सेरेब्रल पालसी) दिवस आनंददायी व्हावा, म्हणून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वाळूजतर्फे विहंग विशेष गुरुवारी मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

सर्व समावेशी समाज उभा करायचा असेल तर मुलांना एकत्र आणणे जरुरी आहे. सामान्य मुलांनी दिव्यांग मुलांबरोबर हात पकडून जेव्हा फेरा धरला तेव्हा समावेशी समाज शक्य आहे असेच वाटले. यावेळी पोदारच्या विद्यार्थ्यांना सेरेब्रल पालसी म्हणजे काय? त्यांचा अभ्यासक्रम कसा असतो? त्यांना कोणत्या थेरपीची गरज असते? याविषयी माहिती देण्यात आली.

प्रसंगी पोद्दारमधील सामान्य मुलांनी दिव्यांग मुलांसोबत विविध खेळांचा आनंद घेतला. डॉ.मंगेश कदम यांनी विशेष मुलांच्या पालकांची सभा घेऊन वयात येणाऱ्या मुलामुलींच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. मुले वयात येत असताना गुड टच, बॅड टच’, सोशल डिस्टन्सिंग विषयी पटवून द्यावे. मुलांच्या सवयीची डायरी लिहून ठेवावी. मुलांशी संवाद साधताना त्यांचे शारीरिक वय लक्षात घेता योग्य शब्दांचा वापर करावा. मुलांच्या लैंगिक समस्या काय असतात, त्यावरील उपाय काय आहेत, याबाबत योग्य मार्गदर्शन डॉ. कदम यांनी केले. यासाठी दिशा पाटील, अपर्णा वैद्य यांनी मेहनत घेतली.

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे ग्रामीण भागात चालवल्या जाणाऱ्या संजीवनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून ७४ गावांमधील आशा कार्यकर्त्यांना नॅशनल सेरेब्रल पालसी म्हणजे काय? त्याची लक्षणे व त्यावरील उपचार यासंबंधी पेडियात्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉ. वर्षा वैद्य यांनी मार्गदर्शन केले. आदिती शार्दूल यांनी बहुविकलांग मुलांना समाजात कशा पद्धतीने मदत करू शकतो, याबाबत प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. त्याचबरोबर बहू विकलांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, विविध शासकीय योजना आदींविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT