corona testing 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus: बापरे! ५५ प्रवाश्यांपैकी २३ प्रवासी पॉझिटिव्ह; हर्सूल टी पॉइंटवरील प्रकार

माधव इतबारे

औरंगाबाद: शहरात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवारी (ता. २२) हर्सूल टी पॉइंटवर ५५ जणांची ॲन्टीजेन चाचणी केली असता तब्बल २३ जण कोरोनाबाधित आढळून आले. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर दिवसभरात ३७ प्रवासी पॉझिटिव्ह निघाले.

महापालिकेच्या पथकाने सोमवारी सहा एन्ट्री पॉइंटवर प्रवाशांची तपासणी केली. त्यात चिकलठाणा येथे ७० पैकी पाच, हर्सूल टी पॉइंटवर ५५ पैकी २३, कंचनवाडीत ३३ पैकी सहा, नगर नाका येथे १८ पैकी दोन, दौलताबाद टी पॉईंट येथे २६ पैकी एक पॉझिटिव्ह निघाला. 

५० व्यापारी, कर्मचारी ५० पॉझिटिव्ह 
व्यापारी महासंघ व महापालिकेतर्फे आयोजित शिबिरात ५० जण पॉझिटिव्ह निघाले. न्यू गुलमंडी येथे ६६ पैकी आठ, अंगुरीबाग येथे ३७ पैकी चार, बालाजी धर्मशाळा शहागंज येथे ४३ पैकी चार, अदालत रोड येथे ९७ पैकी ११, रंगार गल्ली येथे ३६ पैकी सहा, पाटीदार भवन येथे ६९ पैकी १७ जण पॉझिटिव्ह निघाले. दिवसभरात ३४८ जणांच्या चाचणी करण्यात आल्या.

सरकारी कार्यालयात ३२ पॉझिटिव्ह 
सरकारी कार्यालयात दिवसभरात ३२ पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिका मुख्यालयात २२ जणांची चाचणी केली असता चार पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयात ३२ पैकी १२, जिल्हाधिकारी कार्यालयात ४१ पैकी सहा, विभागीय आयुक्त कार्यालयात ११९ पैकी पाच, आरटीओ कार्यालयात १०१ पैकी पाच पॉझिटिव्ह आढळून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिविगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

SCROLL FOR NEXT