corona vaccine 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरात आतापर्यंत ४६ हजार जणांना कोरोनाची लस; एप्रिल अखेरपर्यंत मिळणार दोन्ही डोस

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने एप्रिलअखेर शहरातील दोन लाख १६ हजार जणांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून देशभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. पहिल्या टप्प्यात लस देताना आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली होती.

२५ हजार ९९१ जणांची लस घेण्यासाठी नोंद झाली. त्यानंतर १५ हजार १०५ फ्रंट लाईन वर्कर्सची नोंदणी झाली. दरम्यान ४५ ते ४९ वयोगटातील आजारी व्यक्तींची संख्या २९ हजार २६० एवढी आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक लाख ४६ हजार ३०० एवढी आहे. या सर्वांना एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत लसीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत ४६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

रेड झोनमधील १९ वॉर्ड टार्गेट- 
महापालिकेने ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण असलेल्या वॉर्डांना रेड झोनमध्ये टाकले आहे. असे १९ वॉर्ड असून, या वॉर्डांमध्ये लसीकरणावर भर दिला जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे डोस ज्येष्ठ व आजारी नागरिकांना दिले जातील, असे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर दानचोरी : आरोपींकडे लाखोंची रोकड अन् अमेरिकन डॉलर; मोजणी कक्षातून टॉयलेटमध्ये लपवत होते पैसे, तिथून...

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

'तू शोमध्ये आलासच का?' कंगनाने घेतली राम कपूरची शाळा, लॉकअप २ चा Viral Video

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT