Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad crime : एकाच दिवशी केले पाच गुन्हेगारांना हद्दपार

पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी काढले आदेश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चोऱ्या, मारामाऱ्या, विनयभंगसारख्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेत शहरासह जिल्ह्यातून एकाच दिवशी तब्बल पाच गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी आज काढले. विशेष म्हणजे प्रत्येक आरोपीविरोधात पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचेही उपायुक्त गिऱ्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दत्तू शंकर पिंपळे (२५, रा. जोगेश्वरी), रवी कचरू मुकुटमल (वय ३४, सावित्रीबाई फुलेनगर, वडगाव कोल्हाटी), अमोल जगन्नाथ गायकवाड (२१, रा. वडगाव कोल्हाटी), रईस खान रियाज खान (२६, रा. रोशनगेट) आणि निशिकांत ऊर्फ बब्बी राजू शिर्के (३४, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) अशी त्या हद्दपार गुन्हेगारांची नावे आहेत. दत्तूविरोधात चोऱ्या, दारू आदि मालासंदर्भातील आठ गुन्हे, तर आरोपी रवी मुकुटमलविरोधात गंभीर मारहाण, दारू यासारखे सहा गुन्हे आणि अमोल गायकवाड याच्याविरोधात मारहाण करून लूटमार करणे असे पाच गुन्हे दाखल आहे.

तिघाही आरोपीविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय रईसखान याच्याविरोधात दुचाकी चोरीचे चार सिटीचौक, एक जिन्सी आणि एक सिडको असे सहा गुन्हे दाखल आहेत, तर भावसिंगपुऱ्यातील आरोपी निशिकांत शिर्केविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गंभीर मारामारीसह एक विनयभंग असे पाच गुन्हे दाखल असल्याचेही गिऱ्हे यांनी सांगितले.

अशी असते हद्दपारीची प्रक्रिया

एखाद्या आरोपीच्या गुन्ह्यात वारंवार होणारी वाढ पाहता, संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोलिस उपायुक्त यांच्याकडे त्या आरोपीच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवितात. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्तांकडे पाठविला जातो. त्यावर ते उपायुक्तांना अहवाल सादर करतात. त्यानंतर उपायुक्त हे आरोपींच्या हद्दपारीसंदर्भातील प्रस्ताव अंतिम करून आदेश काढतात व आरोपींना नोटीस बजावतात.

वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही करून एकाच दिवशी पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. अजूनही गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार आमच्या रडारवर आहेत.

- दीपक गिऱ्हे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT