Crime News sakal
छत्रपती संभाजीनगर

शिव्या देऊ नको, असे सांगायला गेलेल्या युवकाचा कानच तोडला

युवकाच्या कानावर...

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : मद्यप्राशन करून आलेल्या व्यक्तीस आपल्या घरासमोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू नका, असे सांगावयास गेलेल्या युवकाच्या कानावर मद्यपी व्यक्तीने ऊसतोडण्याच्या कोयत्याने वार करुन त्याचा कान तोडल्याची घटना मंगळवारी (ता.नऊ) रात्री मुरमा (ता.पैठण) येथे घडली आहे. पाचोड पोलिसांनी विविध कलमाखाली संबधिताविरुद्ध बुधवारी (ता.दहा) सकाळी गुन्हा दाखल केला. यासंबंधी कैलास मूरलीधर चिडे (वय २९, रा.मूरमा, ता. पैठण) याने पाचोड पोलिस ठाण्यात (Crime In Aurangabad) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी (ता. नऊ) रात्री आठ वाजेच्या सुमारास मी माझ्या घरासमोर असतांना गावातील अमोल जगन्नाथ चिडे हा दारू पिऊन आमचे घरासमोर आला व तो अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. तेव्हा आम्ही त्यास समजावून (Aurangabad) सांगण्यास गेलो की आमच्या येथे पाहूणे आलेले आहेत व घरांत महिलाही आहेत.

तू अशा घाणेरड्या शिव्या देऊ नको असे समजावून सांगताना अमोल चिडे याने त्याच्या कमेराला ठेवलेला धारदार कोयता माझ्या डोक्याच्या डाव्याबाजूला कानावर मारला. यांत कानाला गंभीर दुखापत होऊन कान कापला जाऊन व डोके फुटून गंभीर दूखापत झाली. या घटनेनंतर तो घटनास्थळाहून पसार झाला. या घटनेनंतर मला माझा पुतण्या विजय बंडू चिडे व शेजारी राहत असलेला आबासाहेब मापारी यांनी जखमी अवस्थेत मोटारसायकलीद्वारे उपचारकामी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव अधिक होत असल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास औरंगाबाद येथे पाठविले असल्याचे म्हटले आहे. सदरील तक्रारीन्वये पाचोड पोलिसांनी अमोल जगन्नाथ चिडे याच्याविरूद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT