crime news
crime news 
छत्रपती संभाजीनगर

२० हजारांत आरोपीची बाजू मांडायला तयार झाला पोलीस निरिक्षक

संतोष शिंदे

पिशोर (औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्यात नुकतेच नियुक्त झालेले पोलिस उपनिरीक्षक मंगळवारी (ता.02) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. रणजित गंगाधर कासले (वय 36) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी नुकतेच पिशोर पोलिस ठाण्यात रुजू झाले होते.

या विषयी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार तरुणावर पिशोर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत छेडछाड, विनयभंग व जीवे मारण्याची धमकी आदी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात न्यायालयाने तरुणाला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून तपास अधिकारी म्हणून कासले याला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तक्रारदाराच्या बाजूने म्हणणे मांडण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. पिशोर येथील सिल्लोड नाक्यावर सकाळी साडेदहा वाजता ही कारवाई करण्यात आली. पिशोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलिस अधिक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधिक्षक श्री.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश पंडुरे, पोलिस अंमलदार सुनील पाटील, अशोक नागरगोजे, चालक देवसिंग ठाकूर यांनी ही कारवाई केली.

लाचलुचपत विभागाची दुसऱ्यांदा कारवाई-

काही महिन्यांतच लाचलुचपत विभागाची एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच के. टी. वाघ या पोलिस कर्मचाऱ्याला एक हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पिशोर पोलिस ठाण्याचा दुसरा पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही गुन्ह्यात येथील बहुतेक तपासी पोलिस अधिकारी, बिट जमादार तडजोड करतात व पैसे मागत असतात, असा आरोप नागरिक करत आहेत. सामान्य नागरिकांच्या मनामध्ये सध्या पिशोर पोलिसांबद्दल प्रतिमा मलीन झालेली दिसत आहे. गंभीर गुन्ह्यात वाढ, अवैध धद्यांना अभय, गुन्हेगारांवर वचक नाही, गुन्हे तपासाचा आलेख खालावला असल्याची देखील चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाज चालू आहे.

पिशोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक, बेकायदेशीर दारू विक्री, कल्याण मटका, जुगार आदींसह अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास रखडलेला आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे पोलिस ठाणे हद्दीत घडून येत आहेत. नुकतेच पोलिस ठाण्याच्या आवारातच एका कैद्याने शौचालय सफाईचे रसायन पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेत एक पोलिस कर्मचारी निलंबित असून सहायक पोलिस निरीक्षकाची चौकशी चालू आहे.

गेल्या आठवड्यातच करंजखेड येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली होती, मात्र याची खबर पिशोर पोलिसांना नव्हती हे देखील दुर्दैवी आहे. पिशोर पोलीसांच्या या अनागोंदी कारभाराकडे वरिष्ठ लक्ष देतील अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT