Aurangabad Crime News
Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

तलाठ्याच्या परीक्षेत बोगस उमेदवार, तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सुषेन जाधव

औरंगाबाद : तीन दिवसीय तलाठी परीक्षेत स्वत:च्या नावे बोगस उमेदवार बसविणाऱ्या जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शनिवारी (ता.दहा) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एकूण अकरा उमेदवार आढळून आल्याची माहिती हर्सूल पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या आहेत. यापैकी जिल्ह्यातील उमेदवार समाधान भोतकर (२७, रा. हट्टी, ता. सिल्लोड), अंबादास साबळे (२८, रा. गणेशनगर, सिडको महानगर, वडगाव कोल्हाटी) आणि खुशालसिंग ठाकूर (३७, रा. संजरपूरवाडी, परसोडा, ता. वैजापूर) यांच्याविरुध्द हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यात २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी एका दैनिकातून जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ८४ रिक्त पदांसाठी ही परीक्षा होती. हर्सूल भागातील औताडे कॉम्पलेक्सजवळील असलेल्या ड्रीम लॅण्ड इंग्लिश शाळेतही ही परीक्षा पार पडली होती. त्यावेळी मुळ कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश उमेदवारांना देण्यात आले होते. ही परीक्षा पार पडत असताना सीताराम भोतकर, अंबादास साबळे आणि खुशालसिंग ठाकूर यांनी स्वत: ऐवजी बोगस उमेदवार परीक्षेला बसवले.

परीक्षा पार पडल्यानंतर पोर्टलवर भरण्यात आलेल्या अर्जावरील फोटो आणि स्वाक्षरी तसेच प्रत्यक्षात परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांच्या फोटो, स्वाक्षरीत तफावत आढळून आली. त्यावरुन ३ एप्रिल रोजी नगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात तहसीलदार (महसूल) माधुरी आंधळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यापैकी तीन उमेदवारांनी हर्सूल भागातील शाळेतून परीक्षा दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सचिन इंगोले करत आहेत. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT