Kannad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

कन्नड तालुक्यात जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष शिंदे

पिशोर(जि.औरंगाबाद) : पिशोर (ता.कन्नड) परिसरातील जनावरांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता.२३) तीन जणांना रंगेहाथ पकडून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चार बैल व एक वाहन असे मिळून एकूण 4 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, दीपक कैलास वाघ (वय 25, रा.करंजखेडा) यांनी ता.14 मार्च रोजी पिशोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी म्हैस चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती.

स्थानिक गुन्हे शाखा गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून जनावरे चोरीचा गुन्हा शेख निसार शेख महंमद (रा. युसूफ कॉलनी, करंजखेडा) व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी (ता.23) करंजखेडा येथील काकासाहेब देशमुख चौकात सापळा लावला. संध्याकाळी साडेसात वाजता एक महिंद्रा बोलेरो (एमएच 20 सीटी 9425) करंजखेडा गावातून आली. या गाडीस थांबवून गाडीतील शेख निसार शेख युसूफ (वय 38) व वसीम अजीज कुरेशी (वय 22, दोघे रा. करंजखेडा, ता.कन्नड) यांना गाडीतील बैलांविषयी माहिती विचारली असता हे बैल नागद तांडा येथून आणले असल्याचे व त्यांच दाखला नसल्याचे सांगितले.

त्यांना करंजखेडा येथील चोरी गेलेल्या म्हशीबद्दल विचारणा केली असता या दोघांनी आणखी एक साथीदार सोहेल युसूफ शेख (वय 23, रा.करंजखेडा) असे तिघांनी मिळून गावातीलच दीपक कैलास वाघ, शेख सलमान व सूर्यभान वळवळे यांच्या शेतातून तीन म्हशींची वेगवेगळ्या दिवशी रात्रीच्या वेळी चोरी करून त्या मालेगाव येथील व्यापाऱ्यास विक्री केल्या आहेत व त्यातून मिळालेली रक्कम आपापसांत वाटून घेतली आहे अशी कबुली दिली. वसीम कुरेशी याने मिळालेल्या रकमेतून रेडमी कंपनीचा मोबाईल हँडसेट विकत घेतला असल्याचे सांगितले.

आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या म्हैस विक्रीतून प्राप्त रोख रक्कम 54 हजार रुपये, तीन मोबाईल हँडसेट, एक महिंद्रा बोलेरो पीकअप गाडी व गाडीतील चार लहान मोठे बैल असा एकूण 4 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तीनही आरोपींना पुढील कारवाई साठी पिशोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत, सहायक फौजदार वसंत लटपटे, पोलिस नाईक विक्रम देशमुख, वाल्मिक निकम, संजय भोसले, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला 'मंगल मिलन' असे नाव देण्यात आले

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT