crime news 
छत्रपती संभाजीनगर

पोटच्या मुलीचा जन्मदात्या पित्याकडूनच विनयभंग; नात्याला काळीमा फासणारी घटना

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: पोटच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पित्याला विविध कलमांखाली पाच वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी (ता. बारा) विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सुनावली.

या प्रकरणातील पीडिता ही फुलंब्री तालुक्यातील आहे. घटना ७ एप्रिल २०२० रोजी घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पीडितेचा रिक्षाचालक पिता हा घरीच होता. आई शेतीत कामाला गेल्यानंतर पिता पीडितेशी लगट करायचा. रात्रीही जवळ येऊन अश्लील स्पर्श करायचा. त्याची माहिती आईला दिल्यानंतर पित्याने पीडितेसह तिच्या आईला चाकू दाखवून धमकी दिली व घरातून निघून गेला.

या संदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर फुलंब्रीचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा सरकारी वकील सुदेश सिरसाठ यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. फिर्यादी, तिची आई व मुख्याध्यापक यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला वरील शिक्षा सुनावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT