छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या रांजणगाव येथे मटका अड्ड्यावर छापा, अकरा आरोपी ताब्यात

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवत चिठ्ठ्यावर आकडे लिहून मटका नावाचा जुगार खेळताना विशेष पथकाने छापा टाकून अकरा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून एक लाख १७ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या आदेशाने वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी (ता.१७) सायंकाळी करण्यात आली. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांना माहिती मिळाली की, रांजणगाव (शेणपुंजी) येथे चिठ्ठ्यावर आकडे लिहून मटका नावाचा खेळ खेळला जात आहे.

या माहितीवरून पोलिस आयुक्तांनी विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे, पोलिस नाईक सय्यद शकील, पोलिस शिपाई इम्रान पठाण, अनिल खरात, एम.बी.विखणकर, व्ही.आर.निकम, व्ही.एस.पवार यांनी वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी सायंकाळी छापा मारला असता देविदास मधुकर बेंद्रे यांच्या खोलीत आणि अंबादास नाथराव कठोळे (रा. दत्तनगर) यांचे शटरमध्ये बाबासाहेब पंढरीनाथ डोंगरे उर्फ डी.जे. उर्फ कैलास (वय २९), धंदा मटका चालक (रा.राधानगरी, रांजणगाव (शेणपुंजी), अविनाश राम कुलाल (१९) मटका चालक (रा.पवननगर, रांजणगाव शेणपुंजी), सखाराम परसराम सावते (४६, धंदा मजुरी, रा. पवननगर, रांजणगाव), भाऊसाहेब तात्याराव ठोकळ (वय ४६, धंदा मजुरी रा.नर्सरी कॉलनी, रांजणगाव-शेणपुंजी), संतोष तुकाराम सावळे (३७, धंदा मजुरी, रा. कमळापुर, रांजणगाव), राहुल गोपाल जाधव (३२, धंदा मजुरी, रा. गांधीनगर, रांजणगाव), भाऊसाहेब कारभारी नलावडे (५८, सिक्युरिटी गार्ड, रा. गणेश वसाहत वाळूज), माधव शंकरराव बिराजदार (२८, धंदा मजुरी, रा.पवननगर, रांजणगाव), माधव गोंडप्पा साखरे (२८, धंदा मटका चालक रा. दत्तनगर रांजणगाव, (शेणपुंजी), संगमेश सूर्यकांत मालगे (३२, धंदा मजुरी रा.रांजणगाव फाटा), अशोक गंगाराम हिंगोले (४१, धंदा पेंटर रा. जुने रांजणगाव, शेणपुंजी) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चिठ्ठ्यावर आकडे लिहून मटका नावाचा जुगार खेळ खेळताना मिळून आले.

त्यांच्या ताब्यात १६ हजार ३०० रुपये रोख रकमेसह १ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भाततील पोलिस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे कार्यालयीन आदेश तसेच जिल्हाधिकारी यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अन्वय दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमासह भारतीय दंड विधानप्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT