husband murder by wife in bhandara 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : वैजापुरातील तरुणाच्या खूनाचा उलगडा होईना!

भानुदास धामणे

स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की हा दरोडा नसून खूनच आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात-लवकर आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील Vaijapur खंबाळा फाटा येथे एका शेतवस्तीवर अज्ञात दरोडेखोर यांनी एक कुटूंबाला जबर मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.एक) पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना घडून तीन दिवस उलटले तरी देखील अद्याप पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागलेले नाही. तालुक्यातील खंबाळा शिवारातील जिजाराम राधाजी गोरसे यांच्या राहत्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी Robbery चोरी करण्याच्या उद्देशाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. आईवडील एका रूममध्ये तर दुसऱ्या रूममध्ये त्यांचा मुलगा राजेंद्र व त्याची पत्नी झोपलेले होते. दरोडेखोरांनी राजेंद्रच्या रूममध्ये कडी कोयंडा तोडून प्रवेश केला. राजेंद्रला हत्याराने डोक्यात मारुन जागेवर ठार केले. मोनिका राजेंद्र गोरसे हिच्या पण डोक्याला, गळ्याला तसेच तोंडावर मारुन गंभीर जखमी केले. मोनिका हिस गंभीर जखमी केले. मोनिकाही औरंगाबाद Aurangabad येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.aurangabad crime news still killing of young man mistry not solved in vaijapur

दरोडा नसून खूनाचा संशय

जिजाराम गोरसे यांच्या शेत वस्तीवर पडलेला दरोडा हा दरोडा नसून खून करण्याच्या उद्देशानेच दरोडेखोर हे घरात घुसले होते. घरामध्ये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असताना देखील दरोडेखोरांनी कोणत्याही वस्तूला हात न लावता फक्त खून करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचा संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर खूप मोठा पेच निर्माण झाला आहे. स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की हा दरोडा नसून खूनच आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात-लवकर आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

लवकरात-लवकर आरोपी जेरबंद करू

घटना घडल्यापासून आम्ही पथके तैनात केलेली आहेत आणि ती पथके योग्य दिशेने तपास करीत आहेत. अद्याप काही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे संशयाची सुई कोणाकडे फिरते हे देखील सांगता येणार नाही. त्यामुळे आम्ही आरोपीला लवकरात-लवकर जेरबंद करू, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हा दरोडा पडलेला आहे आणि अद्याप आरोपी जेरबंद झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खंबाळा शिवार शेतीचे शिवार असल्यामुळे रात्रीअपरात्री शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागते. परंतु ही घटना घडल्यापासून संध्याकाळी सातच्या नंतर घराच्या बाहेर देखील कोणी निघत नाही, असे एका शेतकऱ्याने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT