नालासोपाऱ्यातील मंदिरात चोरी 
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात कुटुंबाला घरात कोंडून सव्वा लाखाचा ऐवज चोरला

शेख मुनाफ

चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ते राहत असलेल्या घराच्या मुख्य लोखंडी गेटचा कुलुप तोडुन घरात प्रवेश केला व घरातुन कोणीही बाहेर येऊ नये म्हणून बाहेरील दोन्ही दरवाजे व आतील दोन दरवाजे याची बाहेरुन कडी लावली.

आडुळ (जि.औरंगाबाद) : बाहेरुन कडी कोयंडा लावून शेतकरी कुटुंबाला घरात कोंडुन अंदाजे सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी Robbery लांबवल्याची घटना आडुळ बुद्रूक (ता.पैठण) Paithan येथील शेतवस्तीवर घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतरही चार शेतकऱ्यांच्या घरात याच पद्धतीने प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतीवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. आडुळपासून Aurangabad जवळच शेतवस्तीवर येथील बेरुबा मंदिरजवळ राहणाऱ्या शिवाजी नबाजी भावले यांचे शेतात घर आहे. ते येथेच कुटुंबासह राहतात. शनिवारी (ता.१९) रात्री झोपल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ते राहत असलेल्या घराच्या मुख्य लोखंडी गेटचा कुलुप तोडुन घरात प्रवेश केला व घरातुन कोणीही बाहेर येऊ नये म्हणून बाहेरील दोन्ही दरवाजे व आतील दोन दरवाजे याची बाहेरुन कडी लावली. ज्या घरात सोनं व नगद पैसे होते. त्यात प्रवेश करुन कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकुन कपाटात ठेवलेले नेकलेस ११ ग्राम, मनी २ ग्रॅम, बाळी २ ग्राम, नथ २ ग्राम व शेती मशागतीसाठी ठेवलेले नगद १५ पंधरा हजार रुपये असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. Aurangabad Crime News Thieves Looted Above One Lakh Jewellery, Amount

तर जवळ राहणाऱ्या शेख रहिम यांचे १० हजार लांबविले आणि शेख अब्बास, ज्ञानेश्वर इंगळे, अनिल इंगळे या शेतकऱ्यांच्या घरात याच पद्धतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदरील घटनेची माहिती पाचोड पोलिसांना Pachod Police देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT