Bus Theft In Aurangabad Crime News
Bus Theft In Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

चक्क मुंबईतून बसची चोरी करुन आणली पैठणला, पोलिसांनी पाठलाग करुन चौघांपैकी पकडले दोघांना

चंद्रकांत तारु

पैठण(जि.औरंगाबाद) : बोरिवली (मुंबई) येथून चोरी करुन आणलेली १९ लाख रुपये किमतीची एक बस फोडुन तिचे पार्ट्स काढत असतांना पैठण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव दोन संशयितांना दोन किलोमीटर अंतर पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (ता.१५) शहराजवळील गोलनाक्याजवळील एका शेतात घडली. या शेतातील एका बाभळीच्या झाडाच्या आडोशाला बस लावून फोडण्याचे काम करीत होते. दरम्यान, या घटनेतून गाड्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, सदर बस बोरिवली वेस्ट मुंबई येथील पोलिस ठाण्यात या बसच्या चोरी बाबत गुन्हा दाखल आहे. या घटनेची माहिती पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना कळवली असुन बोरिवली पोलिसांचे पथक पैठणकडे रवाना झाले आहे. दरम्यान, बसची तोडफोड सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, सी.जी.गिराशे हे तिघे जण घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे लक्षात येताच बसजवळ असलेल्या चार व्यक्तींनी तेथून पळ काढला. परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यात दोघा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य एक जण पळुन जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरुन बसच्या फोडलेल्या काचा व आतील सीट या वस्तू ही ताब्यात घेतल्या आहे. तसेच सदर बस जप्त करुन पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहे.


अन्य मोठ्या वाहनांच्या चोरीचा पोलिस घेणार शोध!
सदर बस ही दोन वर्षापूर्वी खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच आयडेल ट्रॅव्हल्स, शहापुर ठाणे या नावाने बस आहे. चोरट्यांनी या बसची चोरी कशी करुन ती बस पैठण येथे कशी आणली व अजून काही बस व इतर मोठ्या वाहनांची चोरी केली काय? या बाबत पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT