crime news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad crime : मनोरुग्ण आईनेच घोटला दोघा चिमुकल्यांचा गळा

सादातनगरातील संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सादातनगरातील बहिणभावाच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ अखेर उकलले असून दोघा चिमुकल्यांचे खून जन्मदात्या आईनेच केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आईला अटक करण्यात आली

असून आलीया फहाद बसरावी (वय २२, रा.सादातनगर, गल्ली क्रमांक तीन, रेल्वेस्थानक परिसरत) असे तिचे नाव आहे, तर आदिबा फहाद बसरावी (वय ६ वर्षे) आणि अली फहाद बसरावी (वय ४ वर्षे) अशी त्या दोघा भावंडांची नावे आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चिमुकल्यांच्या आईला ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी असता, अवघ्या दहाच मिनीटात तीने चिमुल्यांचा जीव घेतल्याची कबुली दिली. आरोपी आई ही मनोरुग्ण आहे. ती जे कृत्य करते ते तिलाच कळत नाही,

असे तीने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे जीव घेण्याचे कारण विचारले असता, तीने काहीच कारण न सांगता मी जीव का घेतला, हेच मला समजले नाही अशीही पुष्टी तीने जोडली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपी महिलेला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलसांनी दिली

अन् ती आजीजवळून उठून गेली...

मृत आदिबा ही दररोज तिच्या आजीजवळ झोपते. घटनेच्या आदल्या दिवशीही ती रात्री जेवण झाल्यानंतर आजीकडे झोपली होती, मात्र सकाळी (सोमवारी) उठून ती भाऊ झोपलेल्या घरात जाऊन झोपली होती. दहादरम्यान मृत आदिबा हिचे वडील म्हाडा कॉलनी परिसरात असलेल्या किराणा दुकानावर गेले होते, त्यावेळी आरोपी आलीया हिने चिमुकल्यांचा गळा, तोंड कपड्याने दाबून जीव घेतला.

दोन्ही चिमुकले जीवानिशी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. जर आदिबा ही आजीजवळ झोपलेली तशीच झोपून राहिली असती, तर तिचा जीव गेला नसता, अशी भावना नातेवाईक व्यक्त करत होते. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT