Farmers crop insurance esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : पीकविमा कंपनी कार्यालयात बांगर यांच्याकडून तोडफोड

हिंगोलीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संताप

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : पीकविम्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींवर कार्यकर्त्यांसह आमदार संतोष बांगर यांनी गुरुवारी (ता. १३) पीकविमा कंपनीच्या येथील कार्यालयात तोडफोड केली. अधिकाऱ्यांना दम दिला.जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानासंदर्भात तक्रारी नोंदविल्या. काही तक्रारी मुदतीनंतर आल्या तर काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे कारण कंपनीने दिले आणि नुकसानग्रस्तांच्या तक्रारी फेटाळल्या. ३० हजारांपेक्षा अधिक तक्रारी फेटाळल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती. शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे विमा कंपनीबाबत तक्रार केली होती. त्यानंतर बांगर यांनी या प्रकरणी लक्ष घातले. औंढा नागनाथ तालुक्यात विमा कंपनीने सर्वेक्षण केले होते. अनेक शेतकऱ्यांची सर्वेक्षणाच्या अर्जावर स्वाक्षरीच नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, पंतगे, प्रकाश दराडे, गुड्डू बांगर यांच्यासह कार्यकर्ते, काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे कोणीही नल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार बांगर यांच्यासह कायकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सर्वेक्षणाचे अर्ज दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बांगर यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचीही बांगर यांनी भेट घेतली. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करावा, अशी सूचना बांगर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT