covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सायबर सेलला करणार जिल्हा प्रशासन सहकार्य

लस न घेता प्रमाणपत्र काढल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस न घेताच बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. यापूर्वीही शहरात बोगस प्रमाणपत्र काढण्यात आल्याचे समोर आले होते. यापार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलला तपास कामासाठी सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

लस न घेता प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत मंगळवारी (ता. १४) गुन्हा दाखल केला आहे. याविषयी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले, जिन्सी पोलिस ठाण्यात यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती घेतली आहे. मोठे रॅकेट असू शकते. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्याशी चर्चा करणार आहे.

प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस यंत्रणेला जी मदत लागेल, ती केली जाईल. लस न घेता प्रमाणपत्र मिळविणार्यांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी जिल्हा प्रशासनानेही सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार हे गुन्हे दाखल होणार आहेत. रेकॉर्ड तपासण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला प्रशासनाने दिल्या आहेत.

औरंगाबादेत अलर्ट

मराठवाड्यात ओमीक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. लातूरमध्ये रुग्ण सापडला असल्याने औरंगाबादेत अलर्टच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून शहर व जिल्ह्यातील खबरदारीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT