Ban Widow Rituals sakal
छत्रपती संभाजीनगर

विधवा प्रथा बंदीचा माणगावातही निर्णय

ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

रुकडी : हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीप्रमाणेच माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीनेही विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मासिक सभेत घेतला. यासंदर्भात गावात जनजागृती करण्याचा तसेच विधवा महिलांना सन्मान देण्याचा ठरावही झाला. संध्याराणी जाधव सूचक, तर सुनीता मगदूम अनुमोदक होत्या. समाजामध्ये विधवांना योग्य सन्मान न दिल्याने त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेतला. (Ban Widow Rituals)

या विधायक कार्याचा वारसा इतर ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे असल्याचे सरपंच राजू मगदूम यांनी सांगितले. समाजामध्ये विधवांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे अशी अमानवी कृत्य करण्यात येतात. शिवाय विधवांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे अशा महिलांच्या नैसर्गिक हक्कावर गदा येते. तो कायद्याचा भंगही आहे.

गावासह देशात विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ही प्रथा बंद कण्याचा निर्णय ठराव सभेमध्ये बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या संध्याराणी जाधव यांनी या ठरावाची अंमलबजावणी स्वतःच्या घरापासून केली आहे. दरम्यान, गावातील मुलीच्या विवाह समारंभात ग्रामपंचायतीतर्फे आशीर्वाद म्हणून माहेरची साडी (पैठणी) भेट देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT