छत्रपती संभाजीनगर

दिव्यांग भवनाचा खर्च २० कोटीवर!

CD
दिव्यांग भवनाचा खर्च २० कोटींवर ----- तीन टप्प्यात कामे ः हडकोत १.६७ एकर जागेवर भव्य इमारत ------ सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १४ ः दिव्यांगांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महापालिकेने हडको एन-१२ येथे १.६७ एकर जागेत दिव्यांग भवनाचे काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आल्यानंतर पुढील दोन टप्प्यांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार दिव्यांग भवनाचा खर्च २० कोटी दोन लाख १८ हजार ६०७ रुपयांवर जाणार आहे. शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. त्यानुसार महापालिकेने दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह भत्ताही सुरू केला आहे. हडको एन-१२ येथे दिव्यांग भवन बांधण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला होता. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानुसार टप्पा-२ व टप्पा-३ चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. शुक्रवारी (ता. १३) झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार दिव्यांग भवनावर तब्बल २० कोटी दोन लाख १८ हजार ६०७ रुपयांचा खर्च होणार आहे. दिव्यांग भवन चालविण्यासाठी अनुभवी संस्थेकडून प्रस्ताव (ईआयओ) मागविले जाणार आहेत. महापालिकेकडे सध्या आवश्‍यक तज्ज्ञ व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नाही. तांत्रिक मनुष्यबळ व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक संस्थांच्या प्रस्तावानंतर योग्य संस्थेची दहा वर्षांसाठी निवड केली जाईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ------- असे आहेत टप्पे - पहिल्या टप्प्यात बहुविकलांग उपचार, मूल्यमापन, पुनर्वसन केंद्र, वाचा-भाषा उपचार, मानसशास्त्रीय उपचार, ऑडिओलॉजी, बालन्यूरोलॉजी, पालकांसाठी समुपदेशन यासह आवश्‍यक सेवा उपलब्ध करून देणार. - दुसऱ्या टप्प्यात विशेष शाळा, विशेष शिक्षण, वैयक्तिक शिक्षण, हायड्रोथेरपी युनिट, जीवन कौशल्य प्रशिक्षण, उपाहारगृह, शैक्षणिक व पुनर्वसनात्मक सेवा. - तिसऱ्या टप्प्यात सेन्सरी पार्क, निवासी व सहाय्य सुविधा, व्यावासायिक प्रशिक्षण, तसेच पुर्वसन, स्वावलंबन कौशल्य विकास आणि सामाजिक विकासासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

SCROLL FOR NEXT