Aurangabad District General Hospital sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘हिरकणी’च कक्षापासून वंचित

कुलुप असल्याने मातांकडून बाळाला उघड्यावरच स्तनपान

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात (Aurangabad District General Hospital) स्तनदा मातांसाठी तयार करण्यात आलेला हिरकणी कक्षच बंद आहेत त्यामूळे येथे येणाऱ्या स्तनदा मातांची गैरसोय होत असून त्यांना हिरकणी कक्षाबाहेरच उघड्यावर बाळाला स्तनपान द्यावे लागत आहे.

नवजात बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी २०१२ मध्ये राज्य सरकारने एसटी बसस्थानकांसह सरकारी कार्यालये, रूग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. स्तनदा माता आणि नवजात शिशूचे कुपोषण यावर मात करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने ही संकल्पना पुढे आणली. आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून यासंबंधी २०१२ ला परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार, हा कक्ष कसा असावा, त्याची ठेवण कशी असावी, त्या खोलीत काय असावे, याबाबत मार्गदर्शक सूचना, वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा देण्याची तरतूद परिपत्रकात नमूद आहे.

या योजनेची एसटी महामंडळाने अंमलबजावणीही केली. मात्र, जिल्हा सामान्य रूग्णालयात हा कक्ष बंद असल्याची स्थिती आहे. जिल्हा रूग्णालयात तान्हुल्याला घेऊन नुकतीच एक महिला आली. बाळाला स्तनपान करायचे होते परंतू हिरकणी कक्षाला कुलुप होते. त्यामूळे या कक्षासमोर खाली जमीनीवर बसण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नाही. त्यामुळे त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

कक्षाचा वापर करतंय कोण?

हिरकणी कक्षाला नेहमी कुलुप असते त्यामुळे बाळाला स्तनपान बाहेरच करावे लागत असल्याची खंत येथे येणाऱ्या माता व महिला व्यक्त करतात. या कक्षाला कुलुप का लावले जाते? या कक्षात मातेला स्तनपान देता यावे यासाठी कांगारू खुर्च्यांची गरज असते परंतू तेथे त्या उपलब्ध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरकणी कक्षाचा वापर काही कर्मचारी करीत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT