बाजार  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : थंडीचे आगमन होताच सुक्यामेव्याची दुकाने थाटली

दुकानदारांना मात्र अद्याप ग्राहकांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : थंडीची हुडहुडी सुरु झाल्यानंतर पाचोड बाजार पेठेत हळूहळू सुक्यामेव्याच्या दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आर्थिक टंचाईमुळे त्यास अत्यल्प उठाव असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) चौफेर ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढल्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

हिवाळा ऋतू पिकांसह पैलवानांसाठी पोषक समजला जातो. खास करून या ऋतूमध्ये पैलवान आपल्या तालमीसह खुराकवर भर देतात. कुस्त्यांचे फड रंगल्याशिवाय कोणतीच जत्रा, यात्रा, उरुस, उत्सवाला वैभव प्राप्त झाल्यासारखे वाटत नाही. अलीकडील काळात दुष्काळस्थिती व दानशूर व्यक्तींनी आखडता हात घेतल्याने कुस्तीलाही अवकळा प्राप्त झाली आहे. पूर्वी घरोघरी गायी, म्हशी असल्याने दूध निघत असे. आता चारा-वैरणी अभावी दुग्धव्यवसाय संकटात सापडून दुधासह सुक्यामेव्याचे भाव गगनाला भिडले. प्रत्येकाला महागाईत घर चालविणे कठीण झाल्याने पैलवानाची कसरत पाहता जेमतेम खुराक तोकडा पडत असल्याचे चित्र आहे.

सध्याचे तरुण केवळ धावणे, व्यायाम करणे इतकाच धडा आत्मसात करीत असून त्यातच महागाईमुळे सर्वाना खुराक घेणे आवाक्याबाहेरचे काम वाटत आहे. एका माणसाचा खुराक म्हणजे अख्ख्या कुटुंबाचा खर्च उचलण्यासारखी स्थिती आहे. हिवाळ्याला प्रारंभ होताच शहरांसह ग्रामीण भागात सुकामेव्याची दुकाने थाटली जातात. यंदाही तेच चित्र पाहावयास मिळत असून बदाम, काजू, खोबरा, जर्दाळू, पिस्ता, गोडंबी, डिंकाचे भाव सर्वसामान्यांच्या खिशांना परवडणारे नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : “चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!” पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT