Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News: परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थ्यांसह एकजण अटकेत

चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर दुसऱ्याच विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Aurangabad Crime News : चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर दुसऱ्याच विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थी मित्राला एमआयडीसी सिडको पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली. तर ज्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आला होता. त्या मूळ विद्यार्थी मित्राला २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली.

अविनाश सजन गोमलाडू (वय २१, रा. भिवगाव, ता. वैजापूर) असे अटकेतील डमी विद्यार्थ्याचे आहे, तर विकास शाहुबा शेळके (२३, रा. टाकळी, पोस्ट मोहरा, ता. कन्नड) या मूळ विद्यार्थी मित्राचे नाव आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोनचे विभागीय व्यवस्थापक वैभव पवार पाटील यांनी फिर्याद दिली की, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय सशस्त्र बलाच्या कॉन्स्टेबल, रायफल्समॅन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदाची परीक्षा आयऑन सेंटरमध्ये ऑनलाइन पद्धतीने होती.

दरम्यान, आरोपी अविनाश याने विकासच्या नावावर परीक्षा हॉलमध्‍ये प्रवेश केला. मात्र, त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने त्याच्या प्रवेशपत्राची कसून तपासणी केली असता त्याने दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आल्याचे सांगितले.

त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक ब्लूटूथ, एक मक्खी हेडफोन, मोबाइल, पॅनकार्ड आणि विकासचे आधारकार्ड सापडले. याप्रकरणी आरोपी विकास यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पोलिसांनी माग काढत अखेर त्‍यालाही २ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास पीएसआय सचिन जाधव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

Anna Hazare : राळेगणसिद्धी- केंद्राची पाहणी करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर समावेत आण्णा हजारे; डॉ. बापूसाहेब नागरगोजे!

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Pandharpur News : पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य पॅरा कमांडो समाधान थोरात वर्ल्ड हाफ आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी पात्र

Junnar Leopard Attack : वडगाव आनंद या ठिकाणी एका तरूणावर बिबटयाने हल्ला करून केले जखमी!

SCROLL FOR NEXT