school holiday
school holiday sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताच शिक्षण विभागाने शाळांना सुट्यांबाबत पत्रक जारी

राजेश नागरे

औरंगाबाद : प्रशासनाच्या जुन्या-नव्या पत्रावर चर्चेच्या फेऱ्या, शिक्षकांच्या संघटनांनी सोशल मीडीयावर व्यक्त केलेली मत-मतांतरे अन् त्यावर निर्माण होत असलेल्या संभ्रमाला अखेर आज पूर्णविराम मिळाला. बुधवारी (ता.१२) ‘सीईओं’च्या दालनात निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीत शाळांना १७ ऑक्टोबरपासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताच शिक्षण विभागाने शाळांना सुट्यांबाबत पत्रक जारी केले होते. यानुसार दिवाळीच्या सुट्या १७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर अशा देण्यात आल्या होत्या. या पत्रानुसार शिक्षकांनी परगावी जाण्यासाठी सुट्यांचे नियोजन केले होते. दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरपासून होत असल्याने शिक्षकांनी रेल्वे, बस, विमानाचे तिकीट बुक केले होते. परंतू, शिक्षण विभागाने २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीबाबत आदेश जारी केला होता. याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविल्याने मंगळवारी (ता.११) शिक्षणाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ११ पैकी ८ संघटनांनी २० ऑक्टोबरपासूनच्या सुट्यांना विरोध दर्शवला. त्यामुळे बैठकीत सुट्यांबाबत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. शिक्षणाधिकारी यांनी याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविला. त्यानुसार बुधवारी सीईओंच्या दालनात बैठक पार पडली. यात चर्चेअंती शासनाच्या निर्णयानुसार १७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सुट्यांबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीला शिक्षक समितीचे विजय साळकर, कडुबा साळवे, शिक्षक सेनेचे अमोल एरंडे, मुप्टाचे संपत साबळे, शिक्षक भारतीचे प्रकाश दाणे, दिव्यांग कर्मचारी संघटना आर. आर. पाटील, शिक्षक संघाचे राजेश हिवाळे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे भीमराव मुंडे आदींची उपस्थिती होती.

सुट्या घ्या पण, गुणवत्तेत सुधारणा करा ः सीईओ

दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने असंख्य विद्यार्थी अभ्यासात अजूनही पिछाडीवर आहेत. दिवाळी सुट्टीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहीणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे. शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्या घ्याव्यात, पण विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यावरदेखील भर द्यावा, अशा सूचना जिल्हा परीषद सीईओंनी यावेळी दिल्या.

दीपावली सुटीच्या निर्णयासाठी सगळ्या संघटना एकजुटीने सोबत राहिल्यामुळे योग्य भूमिकेला न्याय मिळाला. जे सोबत आलेत व जे निर्णयाच्या विरोधात होते, अशा सर्वांचे आभार.

-दीपक पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षकसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT