गिधाड sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : माळरानावर आढळला इजिप्शियन गिधाड

निर्सग मित्र मंडळातर्फे पक्षी निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पक्षी सप्ताहानिमित्त निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोगाबाबा टेकडीच्या परिसरातील माळरानावरील पक्षी निरीक्षणात दुर्मिळ इजिप्शियन गिधाड आढळून आला, अशी माहिती मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी दिली.

कार्यक्रमात किशोर गठडी यांनी पक्षी सप्ताहाबद्दल माहिती दिली. पक्षी निरीक्षण, पक्ष्यांची ओळख व त्यांच्या नोंदी कश्या घ्याव्या याची माहिती दिली. याच बरोबर पक्षी अभ्यासक किरण परदेशी यांनी ई-बर्ड या पक्ष्यांविषयी काम करणाऱ्या अँप विषयी माहिती व प्रशिक्षण दिले.

दुर्बिणीचा वापर करून पक्षी निरीक्षण करण्यात आले. पक्षी निरीक्षणादरम्यान किरण परदेशी यांना अचानक दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी माळरानावर आकाशात घिरट्या घालताना आढळला. या गिधाडाला इजिप्शियन व्हल्चर म्हणातात. हा निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते. याच आकार घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते.

सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एकएकटे किंवा जोडप्याने राहतात.

पक्षी निरिक्षणात राखी ,तितर, होला, भारद्वाज, रातवा, पकोळी, रंगीत करकोचा अशा १६ पक्षांची नोंद करण्यात आली. नागेश देशपांडे, महेंद्र देशमुख, विलास सवडे, प्रकाश ठाकूर यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT