Aurangabad Fifty to sixty years Old tree cutting for company construction
Aurangabad Fifty to sixty years Old tree cutting for company construction sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कंपनीचे शेड उभारण्यासाठी जुन्या झाडांची कत्तल

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील सपना मॅट कंपनीत नविन शेड उभारण्यासाठी सुमारे पन्नास ते साठ वर्ष जुनी व पाच ते सहा झाडांची कत्तल गुरूवारी करण्यात आली. ही झाडे एमआयडीसी कार्यालयाच्या परवानगीने तोडण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील सपना मॅट कंपनीत नविन शेड उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी कंपनीच्या आवारात असलेले सुमारे पन्नास ते साठ वर्ष जुनी झाडे तोडण्यात येत आहे. शिवाय तोडलेल्या झाडांची वाहतूक देखील करण्यात येत आहे. ही झाडे एमआयडीसीच्या परवानगीने तोडली जात असल्याचा दावा कंपनीने केला असला तरी या झाडांच्या कत्तलीमुळे प्रदूषण होण्याची शक्यता असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी शासन लाखो करोडो रुपये खर्च करते. मात्र वाळूज औद्योगिक वसाहतीत परवानगी किंवा विनापरवानगी बेसुमार वृक्षतोड होत आहे.

दिवसेंदिवस हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन ही आजची गरज आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला आळा घालण्याची मागणीही वृक्षप्रेमींसह कामगार व नागरिकांकडून केली जात आहे. तसेच यापुढे वृक्ष तोडणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT