Aurangabad news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ढाल-तलवार घेऊन लढू हिंदुत्वाची लढाई

बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ : राजेंद्र जंजाळ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल, असा विश्‍वास ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी मान्यता दिली.

मात्र, सोमवारी चिन्ह मिळाले नव्हते. मंगळवारी (ता.१२) ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. जंजाळ म्हणाले, की ‘ढाल-तलवार’ हे दोन्ही युद्धाचे प्रतीक आहेत. यात बचाव आणि हल्ला दोन्हींची सोय असते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आमचे युद्ध सुरू आहे. लवकरच आम्हाला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले, की आयोगाकडून मिळालेल्या चिन्हाच्या मदतीने बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाईल, अशी ग्वाही दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT