Aurangabad first day of school Students will receive books sakal
छत्रपती संभाजीनगर

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके

महापालिकेत अनुदानित शाळांसाठी आली चार लाख पुस्तके

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व शासन अनुदानित शाळेतील विद्यार्थांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यानुसार यंदा सहा लाख ५६ हजार ९०२ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. गुरुवारी महापालिकेला चार लाख चार हजार ३१३ पुस्तके प्राप्त झाले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थांच्या हाती पुस्तके पडावीत, त्यानुसार वाटप केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शालेय शिक्षण घेता यावे, यासाठी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते.

महापालिकेने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील ५०२ शाळांसाठी १, ३७ हजार ९२ विद्यार्थ्यांसाठी बालभारती पुणेकडून सहा लाख ५६ हजार ९०२ पुस्तकांची मागणी केली. यापैकी ६१ टक्के म्हणजे चार लाख चार हजार ३१३ पाठ्यपुस्तकांचा साठा गुरूवारी प्राप्त झाला. ही पुस्तके महापालिकेच्या सिडको एन-७ व उस्मानपुरा येथील शाळेत ठेवण्यात आली आहेत.

शाळा सुरू होईपर्यंत पुस्तकांचे वितरण केले जाईल. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होईल, असे समग्र शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सांगितले. ५०२ शाळांना पुस्तके वितरित करण्यासाठी युवराज बाबजे, अन्सारी फहिमोद्दीन व शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. गुरूवारी उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, सीबीएसई मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी पुस्तकांची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT