Aurangabad Five years from the father child Stab with razor sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पित्याकडून पाच वर्षाच्या बालकावर वस्ताऱ्याने वार

स्वतःलाही जखमी करून घेतले : कन्नड तालुक्‍यातील सायगव्हाण येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कौटुंबिक वादातून (Family disputes) एका पित्याने आपल्याच पाच वर्षाच्या मुलावर वस्ताऱ्याने वार करून गंभीर जखमी (Seriously injured) केल्याची घटना सायगव्हाण (ता.कन्नड)येथे घडली. यानंतर सदर पित्यानेही स्वतःलाही जखमी करून घेतले आहे.

कन्नड ग्रामीण पोलिस (Kannad Gramin Police) ठाण्याचे निरिक्षक बालक कोळी यांनी सांगितले की, योगेश हरी गोपाळ (रा. हेंद्रुन ता.जि.धुळे) याचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पत्नी पाच वर्षाच्या मुलासह माहेरी सायगव्हाण येथे आली होती. पत्नी सविता गोपाळ (वय २८) हिला भेटण्यासाठी पती (ता.३१) रोजी सायगव्हाण येथे आला होता.

येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरामागील मोकळ्या जागेत पतीने पत्नीला बोलावले. ती न आल्याने पाच वर्षाच्या बालकास जवळ घेत वेठीस धरले. तरीही पत्नी न आल्याने पित्याने पाच वर्षाच्या मुलावर वस्ताऱ्याने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. तसेच जखमी बालकाला पित्याच्या तावडीतून सोडविले. यानंतर ग्रामस्थांनी पती पत्नीमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या योगेश गोपाळ यांनी स्वतःवरही वस्तरा मारून घेतला.

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी लहान मुलास चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी पत्नी सविता गोपाळ (वय २८, रा. हेंद्रुन ता.जि.धुळे) यांनी कन्नड पोलिस ठाण्यात पतीविरुध्द फिर्याद दिली. यावरून भादवी कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस पोलिस कोठडी संपल्यानंतर (ता.३) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हर्सूल कारागृहात केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागरसिंग राजपूत हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT