Aurangabad robbery 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : एकाच रात्रीत चार घरांसह फोडले ग्रामपंचायत कार्यालय

करोडी येथील घटना : श्‍वान जवळच घुटमळले

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : घराला कुलूप असल्याचे हेरून आरोपींनी चार घरे व एक ग्रामपंचायत कार्यालय अशा ५ ठिकाणचे कुलूप तोडून चोरी केली. करोडी येथे घडलेली ही घटना शनिवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली. मात्र, यात नेमका किती ऐवज किंवा ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्या, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

करोडी गावातील मुख्यरोड असलेले ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे, यावेळी चोरट्यांनी ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून डीव्हीआर समजून दुसरेच साहित्य चोरून नेले. या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने येथे प्रशासक म्हणून डी. एन. मगर तर ग्रामसेवक आर. बी. निकम हे काम पाहतात. याबाबत निकम यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कार्यालयातील कपाटामध्ये फिल्टर प्लांटचे दहा ते बारा हजार रुपये रोख होते.

शिवाय महत्त्वाची कागदपत्रे व फायलीही आहेत. मात्र ठसेतज्ज्ञ येणार असल्याने पोलिसांनी कोणत्याही वस्तूला हात लावण्यास मनाई केली. त्यामुळे कपाटात ठेवलेली रक्कम तसेच महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्या किंवा नाही, याबाबत ठाम सांगता येणार नाही, असे ग्रामसेवक निकम म्हणाले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासह जवळच असलेले सुरेश यशवंत जाधव यांच्या भाड्याने दिलेल्या दोन खोल्या, ज्ञानेश्वर विठ्ठल गीते व अनंत रघुनाथ जाधव अशा चार ठिकाणच्या घरांची कुलपे तोडून चोरी करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते गोवर्धन चव्हाण सुनील पठारे अविनाश बर्वंत तसेच गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नजीर पठाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश नवसरे, पोलिस अंमलदार के के आधाने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्याचप्रमाणे स्वान पथकाचे मच्छिंद्र तनपुरे, अनिल जवळकर, एस जी गोरे यांनीही टिपू या श्‍वानासह घटनास्थळी आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील आरोपी हे दुचाकीवर गेल्याने श्‍वान ग्रामपंचायत कार्यालयाजवळच घुटमळले.

चोरीची गावात चर्चा

वाळूज परिसरातील करोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्हीची मोडतोड करून चोरी करण्यात आली. या चोरीत काही महत्त्वाच्या फायली गायब करण्यात आल्या असाव्यात, अशी कुजबुज सुरू आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त झालेला असून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT