fund 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : अतिवृष्टीची भरपाई; गंगापूरला ११ कोटी मंजूर

दिवाळीपूर्वीच तालुक्यातील तब्बल नऊ हजार ४८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर : गंगापूर तालुक्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या भरपाई पोटी गंगापूर तालुक्याला १० कोटी ९२ लाख रुपये मंजूर झाले असून विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच शंख गोगलगायीमुळे देखील पिके फस्त झाली होती. त्यावेळी आमदार बंब यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली होती. तसेच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करून राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या निकषात बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

या मागणीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावानुसार राज्य शासनाच्या निधीमधून गंगापूर तालुक्याला विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत जाहीर झाली आहे. यात जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांच्या नुकसानीसाठी २७ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६ हजार रुपये याप्रमाणे वाढीव मदत मिळणार आहे.

यामध्ये गंगापूर तालुक्‍यातील नऊ हजार ४८ शेतकऱ्यांना १० कोटी ९२ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना निधी वितरित करून आदेश काढले आहेत.

आ.प्रशांत बंब यांच्या मागणीला यश

आमदार बंब यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली होती. तसेच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करून राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या निकषात बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.

खुलताबादला ६ कोटी ५८ लाखांचा निधी

नुकसान भरपाई पोटी गंगापूर तालुक्याप्रमाणेच खुलताबाद तालुक्यातही ६ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : खरात प्रकरणी सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

SCROLL FOR NEXT