Aurangabad Garbage depot fire Machines burn sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कचरा डेपोला आग

चिकलठाण्यात मशिन जळाल्या ; सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद

सकाळ वृत्तसेवा

चिकलठाण : चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने खासगी कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराचे कर्मचारी रात्री १२ वाजेपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करत होते. त्यानंतर ते झोपी गेले. दरम्यान पहाटे अडीचच्या सुमारास ज्याठिकाणी कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या होतात, तिथे प्रचंड आग लागली. हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

अग्निशमन विभागाने चार गाड्यांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. दिवसभर दोन गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा केल्यानंतर सायंकाळपर्यंत ही आग आटोक्यात आली. दरम्यान, घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सौरभ जोशी यांनी पहाटे कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.

त्यांनी सांगितले की, ज्याठिकाणी शहरातून आलेल्या कचऱ्याच्या ट्रक रिकाम्या होतात, त्याठिकाणी आग लागली होती. त्याला लागूनच बेलींग मशिन आहेत. बेलींगमशिनचे या आगीमुळे नुकसान झाले आहे. तसेच प्रकल्पाच्या शेडला देखील फटका बसला आहे.सध्या सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद पडली असली तरी ओल्या कचऱ्यावर मात्र प्रक्रिया सुरू आहे. आगीची पाहणी केल्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना माहिती देण्यात आल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

कशामुळे लागली आग?

कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना महापालिकेसाठी नव्या नाहीत. पडेगाव कचराडेपोच्या परिसरात पडून असलेल्या कचऱ्याला वारंवार आगी लागतात. चिकलठाणा येथे प्रक्रिया केंद्रातील कचऱ्याला आग कशामुळे लागली? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज कर्मचारी व्यक्त करत असले तरी अद्याप स्पष्ट कारण समोर आले नसल्याचे सौरभ जोशी यांनी सांगितले.

सुका कचरा पडेगाव प्रकल्पाकडे वळवला

चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पाची दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र आता चिकलठाणा कचराडेपोत येणारा सुका कचरा पडेगाव कचरा डेपोत नेला जात आहे, असे जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT