Aurangabad Gautala Sanctuary Hiwarkhed Forest Office Theft sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ‘चंदन’ लावणाऱ्याचा अजूनही शोध लागेना

वन विभागात तपासही मंदावला : सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यातील हिवरखेडा वन कार्यालयातून चोरी गेलेले चंदन आणि मौल्यवान दगडांची चोरी करणाऱ्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. या प्रकरणी होणारी चौकशी आणि तपासही मंदावल्यामुळे हे प्रकरण आता पूर्णपणे दाबले गेल्याची चर्चाही सुरु आहे. यामुळे चोरीचा जप्त केलेला इतर मालही किती सुरक्षित राहील यावर शंका उपस्थित केली जात आहे.

गौताळा अभयारण्यातील हिवरखेडा येथील वन विभागाच्या कार्यलयातून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंदन आणि मौल्यवान दगडाची चोरी झाली होती. या प्रकरणी केवळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यासाठी वन विभागाने सहाय्यक वन संरक्षक आशा चव्हाण (वन्यजव विभाग गौताळा) यांची चौकशी समिती नेमली.

चौकशी समितीतर्फे सर्व अधिकाऱ्यांचे जबाब घेणयात आले. यापुढे चौकशी अहवालाचे काय झाले. पोलिस तपासात काय झाले याची काहीच माहिती अद्यापही समोर आलेली नाही. यामुळे वन विभागाला चंदन लावलेले चोर अद्यापही मोकाटच आहेत. या प्रकरणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे मुख्य वनसंरक्षकास पत्र देण्यात आले होते. यात योग्य प्रकारे चौकशी न झाल्यास विभागीय आयुक्त आणि वनमंत्र्याकडे यांची तक्रार करणार असल्याचेही बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT