cyber crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ‘सीईओं’च्याच नावाने गुगल पे वरून पैशांची मागणी

भामट्याविरोधात सायबर क्राईममध्ये तक्रार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे सीईओ तथा प्रशासक नीलेश गटणे यांचे नाव व फोटो वापरून अनोळखी व्यक्तीने गुगल पेद्वारे लोकांकडून पैशांची मागणी करत असल्याचे समोर आले आहे.या प्रकारानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालयातील सायबर क्राईम शाखेत तक्रार केली आहे. असे एसएमएस आल्यावर कुणालाही पैसे पाठवू नका, असे आवाहन नीलेश गटणे यांनी केले. सायबर भामट्याकडून लोकांच्या फसवणुकीच्या अनेक घटना वारंवार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सीईओ नीलेश गटणे यांच्यासोबत घडला आहे.

त्यांनी सांगितले की, सायबर भामट्याने ८४१४९७००६२ हा मोबाईल क्रमांक माझे नाव, व व्हॉट्सॲप प्रोफाईलवरील फोटो वापरला आहे. हा भामटा माझ्या परिचयातील लोकांना गुगल पेवरून पैसे पाठविण्याची मागणी करीत आहे. मी सध्या अडचणीत आहे, मला २ हजार रुपये पाठवा, चार हजार रुपये पाठवा.. असे गुगल पेवरून त्यांना एसएमएस पाठवीत आहे.

सर तुम्हाला काही अडचण आहे का, पैसे पाठवू का, अशी विचारणा करत, काहींनी मला फोन करून केला. त्यामुळे हा प्रकार मला समजला. त्यांच्याकडे नंबरबाबत चौकशी केली असता, सदर नंबर माझा नसल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबत मी सायबर क्राईमकडे तक्रार नोंदविली आहे.हा प्रकार खूप धक्कादायक आहे. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याने कुणालाही संबंधितांचे नंबर पाठ नाहीत. आपण फक्त नाव, फोटो पाहतो, अशा प्रकारच्या गुगल पे वरील मेसेजला कुणीही प्रतिसाद देऊ नये.

-नीलेश गटणे, सीईओ तथा प्रशासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT