Aurangabad Gram Panchayat 75 seats By elections Voting on 5 June sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ग्रामपंचायतींच्या ७५ जागांसाठी लवकरच होणार पोटनिवडणूक

कार्यक्रम जाहीर ः पाच जूनला मतदान, सहारोजी मोजणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या ७५ जागांसाठी निवडणूक विभागाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसंदर्भात ५ मे रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून, १३ ते २० मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी ५ जून रोजी मतदान होणार असून, ६ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

ग्रामपंचायतींमध्ये सदस्याचे निधन, राजीनामा, यासह इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक विभागाने बुधवारी निडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जून महिन्यात ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील पैठण आणि फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी ३ ग्रामपंचायतींतील प्रत्येकी ३, गंगापूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीतील १५, वैजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीतील ९, कन्नड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीतील १३, खुलताबाद तालुक्यातील १ ग्रामपंचायतीतील १, सोयगाव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीतील १३ आणि औरंगाबाद तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीतील १४ जागा अशा ७५ जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ५ मेरोजी सर्व तालुक्याचे तहसीलदार अधिसूचना जारी करणार आहे.

१३ मेपासून उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे. २० मे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असेल. १३ ते १५ मे दरम्यान सुटी असल्याने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी २३ मे रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २५ मे हा दिवस असणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.पोटनिवडणुकीसाठी ५ जून रोजी मतदान होणार आहे. ६ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.मतमोजणीचे ठिकाण जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार ठरविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT