police
police sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

अजिंठा : महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अजिंठा पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) रात्रीच्या सुमारास सापळा रचून पकडला. सुमारे २० लाखांच्या गुटख्यासह १५ लाखांचा टेम्पो असा एकूण सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी नुकताच अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून चार चाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती

पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक राजू राठोड, पोलिस हेड कॉस्टेबल अक्रम पठाण, संजय कोळी, विकास चौधरी, अरुण गाडेकर, निलेश शिरस्कर, प्रभाकर जाधव आदींनी एका हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास सापळा रचला. यावेळी महामार्गावरून जात असलेला टेंपो

(क्र ः एम. एच. २१ बीच ४७३५) अडवून पाहणी केली असता त्यात १९ लाख ८६ हजार ८०० रुपयांचा गुटखा आढळला. चालक गजानन अंबादास लोखंडे (रा.तपोवन ता.भोकरदन,जिल्हा जालना), अण्णा गजानन जगताप (रा.राजूर ता.भोकरदन), अमोल प्रभाकर तुपे (रा.उंबरखेडा ता.भोकरदन) या तिघांविरुध्द अजिंठा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT