छत्रपती संभाजीनगर

औद्योगिक नगरीतून ‘हेल्थ इकॉनॉमी’कडे वाटचाल

CD
औद्योगिकनगरीतून ‘हेल्थ इकॉनॉमी’कडे वाटचाल ... डॉ. विक्रांत भाले : पारंपरिक औद्योगिक विकासापलीकडे उभारावी ‘हेल्थ इकॉनॉमी’ ... (((इंट्रो १)))) डॉ. विक्रांत भाले हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे. शहरातच शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईतील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. वैद्यकीय शिक्षणानंतर महानगरात करिअर करण्याऐवजी त्यांनी पुन्हा संभाजीनगरमध्ये परत येत २०११ मध्ये लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेस प्रा.लि.ची स्थापना केली. गेल्या तेरा वर्षांत कंपनीच्या लेन्सद्वारे २० लाखांहून अधिक रुग्णांची दृष्टी पुनर्स्थापित झाली. ऑरिकमध्ये दुसरा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून, त्यातून संशोधन, उत्पादन आणि निर्यात क्षमता आणखी वाढणार आहे. ... (((इंट्रो २))) छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहन, फार्मा आणि अभियांत्रिकी उद्योगांची भक्कम पायाभरणी झाली आहे. आता या औद्योगिक ताकदीला वैद्यकीय संशोधन, उपकरण निर्मिती, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय पर्यटनाची जोड दिल्यास शहर देशातील महत्त्वाचे ‘मेडिकल इनोव्हेशन हब’ बनू शकते. त्यासाठी पारंपरिक औद्योगिक विकासाच्या पलीकडे जाऊन ‘हेल्थ इकॉनॉमी’ उभारण्याची गरज असून, मेडिकल डिव्हाइस पार्क, संशोधन केंद्रे, कौशल्य विकास संस्था आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा यांचा एकात्मिक विकास करावा लागेल, असे मत लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रांत भाले यांनी व्यक्त केले. ... ‘शहराला आता पारंपरिक औद्योगिक विकासापलीकडे जाऊन ‘हेल्थ इकॉनॉमी’ उभारण्याची गरज आहे. मेडिकल डिव्हाइस पार्क, मेडिकल टुरिझम, संशोधन केंद्रे, कौशल्य विकास संस्था आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा या सर्वांचा समन्वय साधला, तर छत्रपती संभाजीनगर पुढील काळात केवळ औद्योगिक राजधानी नव्हे, तर देशातील अग्रगण्य मेडिकल इनोव्हेशन हब म्हणूनही ओळख निर्माण करू शकेल’, असे मत लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेस प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रांत भाले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘वाहन उद्योग, फार्मा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भक्कम इको सिस्टीम असलेले हे शहर आता मेडिकल टुरिझम आणि मेडिकल डिव्हाइस उत्पादनासाठी सज्ज आहे. त्यासाठी आवश्यक उद्योग, संशोधन, कौशल्य, वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा या सर्व घटकांची बीजे शहरात आधीच आहेत. त्यांना योग्य दिशा आणि धोरणाची जोड मिळाली, तर छत्रपती संभाजीनगर पुढील दशकात देशातील महत्त्वाचे मेडिकल हब बनू शकते. केवळ उद्योग वाढवून विकास होत नाही; त्यासोबत दर्जेदार आरोग्यसेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि मेडिकल उपकरण निर्मितीची परिसंस्था उभारणे तितकेच आवश्यक आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये फार्मा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये, कुशल मनुष्यबळ, ऑटोमोबाइल उद्योग आणि ऑरिकसारखी औद्योगिक क्षेत्रेही आहेत. या सर्वांचा उपयोग करून मेडिकल डिव्हाइस पार्क उभारणे शक्य आहे. आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने सरकारी मदतीतून मेडिकल डिव्हाइस पार्क उभारण्यात आला आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तेथे आल्या, त्याच धर्तीवर संभाजीनगरमध्येही हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. मेडिकल डिव्हाइस म्हणजे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय ज्ञानाचा संगम आहे. या दोन्ही क्षेत्रांत शहराची ताकद असल्याने येथे संशोधन, उत्पादन आणि निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे. अशा उद्योगांमुळे मराठवाड्यातील अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, बंगळुरू किंवा हैदराबादकडे जाण्याची गरज उरणार नाही. संभाजीनगरमध्ये मोठे उद्योग येत आहेत. त्यासोबत देश-विदेशातील अधिकारी, अभियंते आणि व्यावसायिकही येत आहेत. त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, सर्जिकल स्किल सेंटर आणि सुपर स्पेशालिटी उपचार सुविधा उभारणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील अनेक डॉक्टर उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जातात. त्यामागे आधुनिक प्रशिक्षण केंद्रांचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे. जर शहरातच कौशल्य विकास केंद्रे आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या तर हे थांबू शकते. त्यातून मेडिकल टुरिझमलाही मोठी चालना मिळेल.’’ --- योजनेतून उपचाराचा खर्च तातडीने मिळावा केंद्र शासनाच्या मोतीबिंदू निर्मूलन मोहिमेत योजनेतून होणाऱ्या उपचारांचा खर्च डॉक्टरांना मिळण्यात अडचणी आहेत. त्या अडचणी सोडवल्या तर मोतीबिंदू निर्मूलनात आणखी मोठे काम होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. --- आपल्या लोकांचा विश्वास गरजेचा मोतीबिंदू ऑपरेशनमध्ये ‘इंम्पोर्टेड’ म्हणजेच भारी हा गैरसमज दूर झाला पाहिजे. आपले भारतीय उत्पादनही त्याच तोडीच्या गुणवत्तेचे आहे. आपल्या लोकांनी आपल्या उत्पादनावर तेवढा विश्वास ठेवण्याची गरज आहे, असेही डॉ. भाले म्हणाले. --- संशोधनाशिवाय पर्याय नाही मेडिकल उपकरण उद्योग हा सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट (आर ॲण्ड डी) हा उद्योगाचा आत्मा आहे. आज तयार केलेले उत्पादन उद्या कालबाह्य होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक कंपनीने सातत्याने नव्या उत्पादनांवर काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. -- हव्या पूरक सुविधा मेडिकल टुरिझम किंवा मेडिकल डिव्हाइस उद्योग उभारण्यासाठी केवळ कारखाने पुरेसे नाहीत. त्यासाठी शहरात आधुनिक कन्व्हेन्शन सेंटर, आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, हॉटेल उद्योग, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक उद्याने, दर्जेदार शॉपिंग सुविधा आणि सुयोग्य शहरी नियोजन आवश्यक आहे. जगातील अनेक शहरांचा विकास मोठ्या परिषदांमुळे झाला. अशा परिषदांमुळे डॉक्टर, संशोधक, उद्योगपती आणि गुंतवणूकदार एकत्र येतात. त्यातून नवीन उद्योग, संशोधन आणि गुंतवणूक वाढते. संभाजीनगरमध्येही अशी सुविधा उभारल्यास ऑटोमोबाइल, फार्मा, शेती आणि मेडिकल क्षेत्रातील जागतिक कार्यक्रम येथे होऊ शकतात, असेही ते म्हणाले. --- कंपनीत ८० टक्के महिला कर्मचारी डॉ. भाले यांच्या कंपनीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या लेन्समध्ये संशोधन करून दोन पेटंट मिळवले. आज कंपनी २४ प्रकारच्या लेन्सचे उत्पादन करते. पुढील संशोधन इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स आणि अत्याधुनिक मल्टिफोकल लेन्सवर सुरू आहे. आमच्या कंपनीतील १२० कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के महिला आहेत. मेडिकल उपकरणांमध्ये सूक्ष्म गुणवत्ता नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असल्याने महिलांची बारकाई आणि जबाबदारीची भावना उद्योगासाठी मोठी ताकद ठरली, असे निरीक्षणही डॉ. भाले यांनी नोंदवले. --- गुणवत्ता हेच यशाचे सूत्र ‘लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेस प्रा.लि.’ने दोन वर्षे संशोधन केल्यानंतर वर्ष २०१३ मध्ये उत्पादन घेणे सुरू केले. सुरवातीची काही वर्षे कंपनीला मोठा संघर्ष करावा लागला. ‘मेड इन इंडिया’ या शिक्क्याकडे संभाजीनगरातीलच अनेकांनी संशयाने पाहिले. त्यामुळे त्यांनी देशाअंतर्गत बाजारपेठेपेक्षा निर्यातीवर भर दिला. आज कंपनीचा ९५ टक्के व्यवसाय विदेशात आहे. ४५ देशांमध्ये निर्यात होते. युरोप, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये अत्यंत कठोर गुणवत्ता निकष आहेत. त्याची सगळी पूर्तता आम्ही करतो. तिथे सर्व चाचण्या पूर्ण करूनच उत्पादनांना मान्यता मिळते. ती आम्ही मिळवली, असेही त्यांनी सांगितले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT