1m_12 
छत्रपती संभाजीनगर

प्रशांत अमृतकर प्रकरणी कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा मंडळाचे संचालकांना नोटीस

अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. प्रशांत अमृतकर यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने कुलगुरु, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांना नोटिसा बजावण्याचा आदेश न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी दिला आहे.

प्रा.अमृतकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारा विद्यार्थी हनुमंत वाघमारे याच्याकडून पैशाची मागणी केली. त्याची ऑडिओ क्लिप आहे. प्रा. अमृतकर यांना त्वरीत कार्यमुक्त करा, अशी मागणी काही सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना पत्र पाठवून केली होती. कुलगुरुंनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. त्यावर अमृतकर यांनी उत्तर दाखल केले. ऑडिओ क्लिपमधला आवाज अमृतकर आणि वाघमारेचा वाटतो, असा निष्कर्ष काढून समितीने कुलगुरूकडे अहवाल दाखल केला होता.

कुलगुरूंनी प्रा.अमृतकर यांची संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता रद्द केली. त्यांना अधिष्ठाता पदावरून दूर केले आणि त्यांचा लीन पिरियड रद्द केला. याविरुद्ध अमृतकर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यापीठात तक्रार निवारण समिती असताना प्रकरण तिकडे पाठविले नाही. ऑडिओ क्लिप बनावट असू शकते, अशी शंका ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी उपस्थित केली. वाघमारे या विद्यार्थ्यांचीही तक्रार नाही, असा युक्तिवाद ॲड. देशमुख यांनी केला. त्यांना ॲड. देवांग देशमुख यांनी सहकार्य केले. याचिकेची पुढील सुनावणी चार नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : २२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन; चिठ्ठीवरून पाच तरुणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT