Aurangabad Hospital Damage by employee father money issue sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कर्मचाऱ्याच्या पित्याकडून रुग्णालयाची तोडफोड

कामाचे पैसे न देता बदनामी केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : रुग्णालयात कामावरून कमी केल्याचा राग व कामाचे पैसे न दिल्याने एका कर्मचाऱ्याच्या पित्याने दोन मित्रांसह डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना शनिवारी बजाजनगर येथे घडली.

बजाजनगर येथील अष्टविनायक हास्पिटल या रुग्णालयात लॅब, एक्सरे टेक्निशियन म्हणून सुरेश जाधव हा कार्यरत होता. दरम्यान सुरेश याचे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यासोबत सुत जुळल्याच्या संशयावरून रुग्णालय प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकले. त्याचा अडीच महिन्यांचा पगार ४५ हजार रुपये न दिल्याचा आरोप सुरेश यांचे वडील एस एन जाधव यांनी केला आहे. शिवाय त्याच्यावर मुलीची छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आला.

पगार न देता बदनामी केली तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याच्या रागातून सुरेश याचे वडील व त्याच्या दोन मित्रांनी शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रुग्णालयात जाऊन तोडफोड केली. दरम्यान डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पोलिस उशिरा आले : डॉक्टरचा आरोप

या मारहाण आणि तोडफोडीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाली असून घटना सुरू असताना पोलिसांना माहिती दिली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनेच्या दोन तासांनंतर घटनास्थळी आले. तोपर्यंत रुग्णालयातील नर्ससह डॉक्टर प्रेमदास राठोड यांना तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि रुग्णाच्या नातेवाइकांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT