covid vaccine covid vaccine
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लस न घेतल्यास ग्रामीणमध्ये कठोर कारवाई - नीलेश गटणे

सिल्लोडमध्ये सर्वांत कमी लसीकरण, आठ दिवसांत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड तालुक्यातील लसीकरण (vaccine) सर्वात कमी असल्याचे सांगत उपहासात्मक अभिनंदन करून येत्या आठ दिवसांत उर्वरित सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण (vaccine) करून घ्या, अन्यथा कारवाईला तयार रहा, असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे.

सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील लसीकरण, स्वच्छता, जलजीवन मिशन, आवास योजना, महावितरण वीजबिल व मातोश्री पाणंद रस्त्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी सरपंच, ग्रामसेवक व आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता शंभर टक्के लसीकरण व्हावे, यासाठी पंतप्रधानांना औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घ्यावा लागला. त्यामुळे आपण ५४ टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचलो असून राज्यात १६ व्या क्रमांकावर आलो आहोत. पण शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक नियोजन करून आठ दिवसात राहिलेले लसीकरण पूर्ण करावे. यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व सरपंच निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर नाइलाजाने मला कारवाई करावी लागेल असे गटणे म्हणाले. दरम्यान, सिल्लोडमध्ये सर्वात कमी झाल्याने त्यांनी येथे आठ दिवसांत सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता येत्या आठ दिवसांत तालुक्यात किती लसीकरण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, पंचायत विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, प्रभारी कार्यकारी अभियंता के. एस भोसले, तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, गटविकास अधिकारी डॉ अशोक दांडगे, आरोग्य अधिकारी डॉ. नासेर खान तर सोयगाव येथे समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, उपसभापती साहेबराव गायकवाड, गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे, जिल्हा समन्वयक संजय वाघ, राजेंद्र सोनवणे तालुक्यातील सर्व विभागप्रमुख सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

चुकीची कामे करू नका

एका डॉक्टरने बोगस प्रमाणपत्र दिल्यामुळे जिल्ह्याला गालबोट लागले आहे. तेव्हा कुणीही बोगस प्रमाणपत्र देऊ नका, कौतुकासाठी किंवा वेळ मारुन नेण्यासाठी चुकीची कामे करू नका. लस घेण्यासाठी लोकांना तयार करा, ‘हर घर दस्तक’ही मोहीम राबवून लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, लस घेतल्यामुळे देशात एकही मृत्यू झालेला नाही हे समजावून सांगा अशा सूचना तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांना गटणे यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT