crime esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी अडीच लाखांची १९ जनावरे घेतली ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कत्तलीसाठी आणलेले बैल, गाय, कालवड, हेले अशी २ लाख ३० हजार रुपये किमतीची १९ जनावरे उस्मानपूरा पोलिसांनी शुक्रवारी पकडल्याची माहिती निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

प्रतापनगर स्मशानभूमीच्या रोडजवळील मोकळ्या मैदानात गोवंशासह इतर जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, उपनिरीक्षक विनोद आबुज यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारे शहाबाज मुख्तार कुरेशी, रफिक नबाब कुरेशी (दोघे रा. बडा अशुरखाना, उस्मानपुरा) यांची चौकशी केली असता त्यांना उत्तरे देता आली नाहीत. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून २ लाख ३० हजार रूपये किंमतीची १९ जनावरे ताब्यात घेतले आहेत.

उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अरूण हातागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कत्तलीसाठी जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या शहाबाज मुख्तार कुरैशी, रफिक नवाब कुरैशी यांच्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद आबूज करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates List: भाजपची मोठी स्ट्रॅटेजी मीटिंग! विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 12 जणांची चढाओढ; कोण होणार फायनल? लिस्ट आली समोर

Nagpur News: काझीला अमेरिका, बेंगळुरूमधून फंडिंग?; एटीएसकडून होणार तपास; एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू

शेवटी आई ती आईच! सहलीवरून परतलेल्या लेकीला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचली ऐश्वर्या, Viral Video

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी, आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं

राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT